आशाताई बच्छाव
छाबडा हॉस्पीटलच्या आरोग्य शिबीरात 130 रूग्णांची मोफत तपासणी
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे
जालना शहरातील छाबडा हॉस्पीटलच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त छाबडा हॉस्पीटल, लॉयन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटी व रेड स्वस्तिक सोसायटी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.16) घेण्यात आलेल्या मोफत मधुमेह (डायबेटीज)निदान, चिकित्सा, उपचार शिबीरात 130 रूग्णांची मोफत शुगर व आरोग्य तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी लॉयन्स क्लब ऑफ जालना मर्चन्ट सिटीचे अध्यक्ष पवन देशमुख, सचिव लॉ. आनंद वाघमारे, लॉ. अरविंद नाईक, लॉ. डॉ. मनिष अग्रवाल, लॉ. सुनिल भगत, लॉ. फदाड, लॉ. सतीश बगडिया, लॉ. डॉ. आनंद अग्रवाल, लॉ. पंडीत, लॉ. बंकट खंडेलवाल, लॉ. अंकुशराव राऊत,लॉ. आनंद वाघमारे, रेड स्वस्तीक सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र अग्रवाल, सचिव प्रा. मोहन शिंदे, लॉ. विजय दाड, इंद्रजित जाधव , रमेश देहेडकर आदिंची उपस्थिती होती. यावेळी मधुमेह व ह्रदयरोग तज्ञ डॉ. धीरज छाबडा, बालरोग तज्ञ डॉ.तरूणा छाबडा यांनी रूग्णांची तपासणी केली.
यावेळी बोलतांना डॉ.धीरज छाबडा म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात मधुमेह आजार चुकीची जिवनशैली व व्यायामाचा अभाव यामुळे वाढत आहे. याबद्दल जागतीक आरोग्य संघटनेने वेळोवेळी आकडेवारी प्रसिध्द केली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार भारतात 10 कोटी मधुमेहाचे रूग्ण आहेत. व जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2030 पर्यंत भारतात 20 कोटी मधुमेह रूग्ण होतील. या खेरीज प्री. डायबेटीक व्यक्तींची संख्याही मोठी आहे. मधुमेही रूग्णांना मधुमेह नेमका कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे, मधुमेह झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, याबद्दल डॉ. धिरज छाबडा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ. तरूणा छाबडा यांनी मधुमेही रूग्णांचा आहार कसा असावा, व्यायाम कोणता करावा याबद्दल माहिती दिली.