आशाताई बच्छाव
यशासाठी शिवचरित्र कृतीत उतरवावे : भास्करराव दानवे
व्ही. एस. एस. फार्मसी मध्ये शिवजयंती सोहळा
बदनापूर ( प्रतिनिधी दिलीप बोंडे) : प्रतिकूल परिस्थिती प्रचंड आव्हाने ,संकटांचा सामना करण्याचे बळ छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरायांच्या विचारांवर मार्गक्रमण करावे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते भास्करराव पाटील दानवे यांनी केले.
व्ही. एस. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भास्करराव पाटील दानवे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांच्या अध्यक्षतेखाली ॲड. वैशाली कडू यांचे व्याख्यान झाले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे ,गोवर्धन कोल्हे, प्राचार्य गुलशन राठी, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. वैशाली कडू यांनी सर्व घटकांना समान न्याय देणारे छत्रपती शिवरायांची प्रेरणा जगाने घेतली असून युवा पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता शिवनीतीचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.प्रसाद मदन यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिवचरित्र हे प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन गीतांजली अंभोरे व शिवानी नळगे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
_________