आशाताई बच्छाव
परळीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी!
अखंड हिंदुस्तानला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज ऊर्जा स्त्रोत – अँड. मनोज संकाये
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि.१९ फेब्रुवारी २०२५ अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी केली. छत्रपती शिवराय अखंड हिंदुस्तानला प्रेरणा देणारे ऊर्जा स्त्रोत आहेत. शिवचरित्रातून ही ऊर्जा संबंध जाती धर्माच्या लोकांच्या मनात आजही आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंतीदिनी केले. १९ फेब्रुवारी हा दिवस संबंध महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अँड. मनोज संकाये मित्र मंडळाच्यावतीने परळी येथील शिवाजी चौकातील महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुंजाभाऊ साठे, राम जोशी, कैलास रिकीबे, काशिनाथ सरवदे, शिरीष सलगरे,संतोष पिसे, वैजनाथ केंद्रे, सोमनाथ नाईकवाडे, दगडू भाळे, संतोष कांबळे, पत्रकार मोहन चव्हाण, अशोक चव्हाण, सोमनाथ पवार, अभिषेक पवार, प्रवीण रोडे, वैजनाथ चौधरी, नितीन चव्हाण, बालू गुट्टे आदीसह मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.