Home जालना शांतिनिकेतन सारख्या संस्थामुळे गुणवत्ता टिकून -माजी मुख्याधिकारी मनोहर हिरे

शांतिनिकेतन सारख्या संस्थामुळे गुणवत्ता टिकून -माजी मुख्याधिकारी मनोहर हिरे

35
0

आशाताई बच्छाव

1001252991.jpg

शांतिनिकेतन सारख्या संस्थामुळे गुणवत्ता टिकून
-माजी मुख्याधिकारी मनोहर हिरे
शांतिनिकेतनला सदिच्छा भेट
जालना,दि. १८(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)- जालना नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी तथा
कल्याण,भिवंडी, उल्हासनगर इत्यादी महापालिकांचे माजी आयुक्त मनोहर हिरे
यांनी आज जालना शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेस सदिच्छा भेट
दिली.
यावेळी बोलताना मनोहर हिरे म्हणाले की, मी जालना येथे नगरपालिकेचा
मुख्याधिकारी असताना ही शाळा सुरू करण्यात आली. आज या शाळेस अनेक
वर्षानंतर भेट देऊन पाहणी करत असतांना शाळेच्या एकूण प्रगतीचा त्यांनी
आढावा घेतला. या शाळेच्या प्रगतीच्या बाबत त्यांनी समाधान व्यक्त करुन
संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी
जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवनाथ जाधव यांची उपस्थिती होती. पुढे
बोलताना हिरे म्हणाले की, मी मुख्याधिकारी असताना भास्कर आंबेकर यांनी
लावलेले रोपटे आज मोठ्या वृक्षात रूपांतरित होताना अत्यंत आनंद होत आहे.
शाळा व परिसर पाहिल्यानंतर त्यांनी अत्यंत काळजी घेतल्याचे दिसते. या
शाळेत सध्या दोन हजार विद्यार्थी ज्ञान घेण्याचे कार्य करत आहे. हे चित्र
अत्यंत समाधानकारक व आनंददायी असल्याचे सांगत अशा शाळा मधूनच अनेक
विद्यार्थी घडत असतात आयुष्याचा पाया याठिकाणी घडवण्याचे काम या शाळेतून
केले जाते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे हे काम अत्यंत पवित्र आहे.मी
सुद्धा अशाच  ग्रामीण भागातील शाळेतून शिकून इथपर्यंतचा प्रवास केला असून
संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here