Home बुलढाणा जवाहर उर्दू हायस्‍कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोताळाच्‍या विद्यार्थ्यांचे आरोग्‍य प्रंचड धोक्‍यात….

जवाहर उर्दू हायस्‍कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोताळाच्‍या विद्यार्थ्यांचे आरोग्‍य प्रंचड धोक्‍यात….

29
0

आशाताई बच्छाव

1001247145.jpg

जवाहर उर्दू हायस्‍कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोताळाच्‍या विद्यार्थ्यांचे आरोग्‍य प्रंचड धोक्‍यात…. विद्यार्थ्यांच्‍या बसण्याच्‍या बेंचच्‍या पायाखाली साचला कचरा व धुळ तर केव्हा उघडणार शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्या डोळ्यावरील पट्टी…सोयसुविधापासून जवाहर उर्दू हायस्‍कुल व कनिष्ठ महाविद्यालय
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मोताळा तालुक्यातील मोताळा ते मलकापूर रोड वर असलेले विद्यालय शाळा विद्यालय हि विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकासासाठी महत्‍वाचे स्‍थान आहे शाळेत जाणे म्‍हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोष्ट आहे.सामजिक कौशल्‍ये विकसित करणे आणि भविष्यासाठी तयार होणे शाळा विद्यालय हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर असते.मात्र त्‍यांच्‍या त्‍याच घराला अस्‍वच्‍छ ठेवण्याचे काम हे शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक करत आहे.घाणीच्‍या दृषीत वातावरणात विद्यार्थ्यांना घ्यावे लागत आहे शिक्षण तर शिक्षक लोकांना सुध्दा या कचऱ्या मधेच विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे विद्यार्थी मात्र या समस्येपासून ते हतबल झाले आहे.
स्‍वच्‍छता तसेच शाळाच्या सुविधेसाठी पायाभूत मार्फत व इतर शासनाची निधी दरवर्षी शाळेला मिळत आहे आणि त्याचा लाभ सुद्धा घेत आहे. सुविधेच्या नावावर या ठिकाणी कुठल्याच सोयी सुविधा उपलब्ध नाही आहे. हा आलेला पैसा कुठेही जातो आता प्रश्न पालकांनी आणि जनतेने विचारला आहे.

शाळेच्‍या पायाभूत सुविधामुळे विद्यार्थ्यांसाठी आरामदायी, सुरक्षित लक्ष केंद्रित आणि चांगले शिक्षण वातावरण तयार होत असते मात्र या शाळेत असे कुठेच दिसून आले नाही आहे. शासनातर्फे मिळालेल्या निधी हा कुठे जातो असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात येतो.प्रत्‍येक वर्ग खोल्‍यात गेले तर जागोजागी कचरा साचलेला आहे प्रचंड धूळ वर्गात दिसून येते ज्‍या ठिकाणी विद्यार्थी बसतात त्‍या बेंचवर सुध्दा धूळ साचलेली आहे. रोज सायंकाळी किंवा सकाळी शाळेचा शिपाई हा प्रत्‍येक वर्ग खोल्‍या झाडून सपसफाई करत असतो मात्र या ठिकणी शिपाई तर दिसतचं नाही आणि स्‍वच्‍छता सुध्दा कुठेच जवाहर उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोताळा या ठिकाणी दिसून येत नाही. बाहेरील मैदानात सुध्दा प्रचंड घाण साचलेली आहे.येवढ्यावर न थांबता शाळेच्‍या भिंती सुध्दा तसेच इमारत सुध्दा आता खचायच्‍या मार्गावर आली आहे. विद्यार्थ्यांचे शौचालय असलेल्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था नाही आहे. विशेष बाब टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ तसेच विद्यार्थी एकच शौचालयाचा वापर करत आहे. शौचालयाचे दरवाजे सुद्धा हे व्यवस्थित नाही आहे त्याची अवस्था दुर्लभ झाली आहे. तसेच त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्या बाथरूममध्ये मच्छर आणि डास याची उत्पत्ती तयार होत आहे यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या व्‍यतेरिक्‍त अनेक गोष्टी अपुऱ्या आहे. आज या वर्ग खोल्‍यात गेले तर त्‍या मध्ये पंखे जे बसविण्यात आले आहे ते सुध्दा बंद पडलेले आहे येवढेच नाही तर ते पंख्याचे पाते सुध्दा अस्‍थाव्‍यस्‍था अवस्‍थेत आहे. शाळेच्‍या छतामध्ये जे टिन बसविण्यात आले आहे ते सुध्दा निकृष्ठ दर्जेचे आहे.सर्व टिन पत्रांना छंद्र पडलेले आहे पावासाळ्यात या छंद्रातून पाणी वर्गात साचत आहे..
विद्यार्थ्यांच्‍या सुरक्षतेच्‍या बाबतीत झाले तर वेतन विभागाच्या पत्रानुसार व्यवस्थित योग्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य आहे. शासनाच्या आदेशाला डावलून कुठल्याही प्रकारचे पालन न करता स्वतःची मनमानी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक करत आहे. यांची मनमानी कारभार हा कुठेतरी थांबण्यात आला पाहिजे.काही मोचक्‍या ठिकाणी दोन तीन कॅमेरे हे लावण्यात आले आहे मात्र असे बरेच ठिकाणी कॅमेरे सुध्दा बसविण्यात आले नाही आहे.उद्याचालून एखाद्या अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण राहणार आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्‍थितीत होत आहे.विविध घटना या राज्‍यासह देशात घडल्‍या आहे यांची दखल या ठिकाणी घेणे गरजेचे आहे मात्र या ठिकाणी बरेच गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.अशा दुषित वातावरणात विद्यार्थ्यांनी कसे शिक्षण घ्याचे यामुळे त्‍याचे आरोग्‍य सुध्दा धोक्‍यात आले आहे या सोबत त्‍यांचे शैक्षिणिक नुकसान सुध्दा होतांना दिसून येत आहे. शाळा व्यवस्थापक व मुख्याध्यापक यांनी गंभीर समस्‍याकडे दुर्लक्ष न करता लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here