आशाताई बच्छाव
• बेहेड्याची लाकडे जप्त; वनविभागाची कारवाई
बुलडाणा मोताळा तालुक्यातील वडगाव ते सारोळा पीर रोडवरील एका शेतात सापडली लाकडे
बुलढाणा :- मोताळा तालुक्यातील घटना वडगाव ते
सारोळापीर मार्गावर वनविभागाने अंदाजे दोन ते तीन घनमीटर बेहेड्याची लाकडे जप्त केली आहेत. ही कारवाई १४ फेब्रुवारी रोजी रात्री करण्यात आली.
रोहिणखेड वर्तुळातील रोहिणखेड बिट परिसरात वडगाव ते सारोळापीर मार्गावर फर्दापूर फाट्याजवळ रात्री १० वाजता एका ट्रकमधील लाकडांचा माल पडल्याची माहिती वनविभागाल मिळाली.
यावेळी सारोळा मारोती परिसरात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी गस्त घालणारे वनरक्षक एस. एस. तायडे यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता रस्त्याच्या कडेला शेतात बेहेड्याची लाकडे आढळली. रात्र जास्त झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी लाकडांचा माल जप्त करण्यात आला.