आशाताई बच्छाव
जवखेडा ठेंग येथील श्री जनेश्र्वर महादेव मंदिर येथे शिवपंचायतन यज्ञ सोहळा व हनुमंतरायाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 17/02/2025
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथील श्री जनेश्वर महादेव मंदीर श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज गोसेवा आश्रम श्रीक्षेत्र जवखेडा ठेंग येथील परम पूज्य ज्ञानेश्र्वर माऊली महाराज तसेच प.पू.स्वामी माधवगिरीजी बाबा आणि सर्व संतांच्या उपस्थितीत प्रतिवार्षिक शिवपंचायतान यज्ञ सोहळा व हनुमंतरायाची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.13 फेब्रुवारीला शिवपंचायतन यज्ञ सुरुवात झाली होती. रोज दुपारी प्रवचन सुध्दा पार पडले. प्रवचानासाठी भाविक भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. दिनांक 16 रोजी हनुमंताच्या मुर्तीची विधिवत पूजन करुन ज्ञानेश्र्वर माऊली महाराज आणि संत महंत यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच मंदिरावर कलश सुध्दा बसविण्यात आला. तसेच 13 फेब्रुवारीपासुन पासुन दररोज 4 वाजे पासुन ते रात्री 9 वाजेपर्यंत दररोज भक्तांसाठी प्रसाद रुपी जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच कार्यक्रमाची सांगता दिवशी दिनांक 17 फेब्रुवारी 12 वाजता प.पू.स्वामी माधवगिरीजी बाबा यांचे सत्संग प्रवचन झाले. त्यानंतर 2 महाप्रसादाला सुरुवात झाली. जाफराबाद तालुक्यातून नव्हे तर जालना जिल्हाभरातून भाविक भक्तांची गर्दी दिसून आली. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सांगता करतांना श्री जनेश्र्वर महादेव मंदिर गोसेवा आश्रम चे पिठाधिश परम पूज्य ज्ञानेश्र्वर माऊली महाराज यांनी जाफराबाद पोलीस स्टेशनच्या पुर्ण स्टॉप चा चोख बंदोबस्त ठेवल्या बद्दल आभार मानले. तसेच जवखेडा ठेंग येथील गावकरी आणि परिसरातील गावकऱ्यांनी पाच दिवस कार्यक्रमासाठी जी सेवा केली त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. त्यांनी पत्रकारांचा सुध्दा सत्कार केला. तसेच देणगी दारांचे सुध्दा आभार मानले. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.