आशाताई बच्छाव
अर्जुनी नवीन येथे बिबट्याची दहशत दोन बोकड्याला केले ठार ,गावात भीतीचे वातावरण
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भंडारा तालुक्यातील अर्जुनी नवीन येथे आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 ला पहाटेच्या सुमारास पुरुषोत्तम सपाटे, नरेश सपाटे ,यांच्या घरी बांधून असलेल्या बोकड्याला ठार केले .त्यामुळे बोकड मालकाचे अंदाजे 20,000 हजार रुपयाचे नुकसान झालेले आहे. इतकेच नव्हे तर बिबट्याने गावात येऊन यांना ठार केल्यामुळे गावात भीतीचे वातावरण तयार झाले असून या बिबट्याला जेहरेबंद करावे अशी मागणी येथील सरपंच चेतन राघोरते, ग्रामपंचायत सदस्य आकाश शेंडे यांनी केली पुढील तपासणी वनरक्षक पी .एस. मस्के करीत आहेत.