आशाताई बच्छाव
गोंदी पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई
जाफराबाद जालना प्रतिनीधी- मुरलीधर डहाके
16/02/2025
पोलीस ठाणे गोंदी हद्दीत मौजे गोंदी इदगाह जवळ हदगाव रोडवर सायंकाळी एक इसम अवैध दारू विक्री करत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षण अशीष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.1152 फुलचंद हजारे पोलीस कॉन्स्टेबल 1625 नितीन खरात पो.कॉ.शाकेर सिद्दीकी होमगार्ड 1036 गाढे होमगार्ड 1294 राठोड यांनी अवैद्य दारू वगैरे त्यावर कारवाई करत एकूण 4030 रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला . ज्यात 2660 रुपयाची देशी दारू 13870 रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली असून अवैध दारू विक्रेता काकासाहेब लक्ष्मण मरकड याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहे.