आशाताई बच्छाव
चंदनझीरा पोलीस ठाणे हद्दीत तुटमार करणाऱ्या टोळीला चंदनझीरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जाफराबाद जालना प्रतिनीधी – मुरलीधर डहाके
दिनांक 16/02/2025
सविस्तर वृत्त असे की दिनांक 14/10/2024 रोजी शाळेचा विद्यार्थी नामे सागर पंढरीनाथ शिंदे रा.रुपनगर अंबड चौफुली जवळ जालना हा सायंकाळी 07.30 वाजेच्या सुमारास मोतीबाग येथे फिरायला गेला असता अज्ञात तीन आरोपींनी त्यास मारहाण करून त्याची जवळील15000/हजार रूपये किमतीचा वन प्लस नाईट मोबाईल फोन जबरदस्ती हिसकावून घेऊन गेला होता. त्याबाबत सागर शिंदे यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे चंदनझीरा येथे गुन्हा दाखल आहे.
तसेच दि.11/02/2025 रोजी विद्यार्थी नामे रुषभ प्रवीण घोंगडे रा.योगेशनगर अंबड रोड जालना हा दुपारी 04.30 वा. सुमारास नागेवाडी कॉलेज येथे घरी परत जात असताना अज्ञात तीन आरोपींनी स्कुटीवर पाठीमागून येऊन सदर विद्यार्थ्यास मारहाण करून त्याचे जवळील 15000/ रुपये किमतीचा रेडमी नोट कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून नेला होता.सादर बाब रुषभ घोंगडे यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे गुन्हा दाखल आहे.
वरील दोन्ही गुन्ह्याचे प्रो. पोलीस उप अधीक्षक करिष्मा चौधरी यांनी दखल घेऊन सदर मुंडे उघडतील आणणे कमी विशेष पथकाची स्थापना करून सदर पथकाने यांनी गुन्ह्यांचा छडा लावत सदर गुन्ह्यात आरोपी नामे 1) रोहित संतोष जाधव रा.दबलजिन जालना 2) यशराज उर्फ सोनू मुकुंददास वैष्णव रा.दहेडकरवाडी 3) अजिंक्य काकासाहेब साखरे राहणार माळीपुरा जालना यांच्या मुस्क्या आवडल्या असून शाळेच्या विद्यार्थ्यांना वरील गुन्हेने केल्याची कबुली दिली असुन गुन्ह्यात चोरलेला एकूण 30000/ रूपये किमतीचे दोन मोबाईल फोन गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी वाहने किंमत 70000/हजार रुपयाचे जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसोड साहेब मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी साहेब मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुळकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीप्रो. डी. वाय.एस.पी. करिष्मा चौधरी मॅडम, पोलीस उपनिरीक्षक एम.बी. स्कॉट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुख वेताळ, हुसेन अफसर, पोलीस हवालदार प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, संतोष वनवे, साई पवार, सागर खैरे, नवनाथ पाटील यांनी सदरची कार्यवाही केली आहे.