Home बुलढाणा बुलडाण्याच्या सखी वन स्टॉप सेंटर मध्ये चाललंय काय? देहविक्रीच्या व्यवसायातील दोन महिला...

बुलडाण्याच्या सखी वन स्टॉप सेंटर मध्ये चाललंय काय? देहविक्रीच्या व्यवसायातील दोन महिला पळून गेल्या… खिडकीचे गज तोडून झाल्या फरार…!

40
0

आशाताई बच्छाव

1001242221.jpg

बुलडाण्याच्या सखी वन स्टॉप सेंटर मध्ये चाललंय काय? देहविक्रीच्या व्यवसायातील दोन महिला पळून गेल्या… खिडकीचे गज तोडून झाल्या फरार…!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलडाणा बुलडाणा येथील सखी वन स्टॉप सेंटर मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैध देहविक्रीच्या व्यवसायातील दोन महिला पळून गेल्या आहेत. आज, १५ फेब्रुवारीला सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे..
वेगवेगळ्या घटनेतील पीडित महिला न्यायालयाच्या आदेशाने बुलढाणा येथील सखी वन स्टॉप सेंटर मध्ये काही दिवसांच्या निवाऱ्यासाठी ठेवण्यात येतात. यात बलात्कार पिडीत महिला, अल्पवयीन अत्याचार ग्रस्त मुली, अल्पवयीन गर्भवती मुलींचा समावेश असतो. याच सेंटरमध्ये शेगाव येथील एका अवैध देहविक्रीच्या व्यवसाय प्रकरणातील २ महिला ठेवण्यात आल्या होत्या. ह्या दोन्ही महिला आज सेंटर मधून पळून गेल्या आहेत. विशेष म्हणजे खिडकीचे गज तोडून या महिला फरार झाल्या आहेत. यामुळे सखी वन स्टॉप सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसाआधी याच सेंटर मधून एक बलात्कार पिडीत मुलगी आरोपीसोबत फरार झाली होती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here