Home जालना मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा शेती करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा शेती करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

88
0

आशाताई बच्छाव

1001237175.jpg

मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा शेती करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 14/02/2025

जालना जिल्ह्यात अवैद्य गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना सूचना दिल्या की त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध्य विक्री करणारे इसमांची माहिती काढून त्यांचे वर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 13/02/2025 रोजी गुप्ता बातमीदार यांचे मार्फत माहिती मिळाली की मौजे साकळगाव ता. घनसावंगी जी. जालना शिवारामधील शेतामध्ये इसम नामे भास्कर माणिक माने रा. साकळगाव ता. घनसावंगी जि. जालना हा त्यांचे शेतामध्ये मानवी आरोग्यास घातक असलेला गांजाची शेती करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करत आहे. मिळालेल्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना व घनसावंगी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार मौजे साकळगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे नामे भास्कर माणिक माने रा. साकळगाव ता. घनसावंगी जि. जालना त्यांचे शेतात छापा मारून त्यांचा गट क्र.125 साकळगाव शिवारामधील शेतामध्ये पाहणी केली असता इसम नामे भास्कर माणिक माने हा त्याचे शेतामध्ये गांजाचे एकूण 22 झाडांची लागवड करून संवर्धन व जोपासना करीत असताना मिळून आला त्यामुळे सदर गांजाची 22 झाडांची पंचासमक्ष वजन केले असता ते 5 किलो 464 ग्राम असून किंमत अंदाजे 54640/-त्याचे दिसून ते तपास कामी जप्त करण्यात आला असून नामे भास्कर माणिक माने वय 55 वर्ष रा. साकळगाव ता. घनसांगी जि. जालना यांचे विरुद्ध पोलीस ठाणे घनसावंगी जालना येथे सरकारतर्फे उपनि राजेंद्र वाघ स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचे फिर्यादीवरून एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा .पोलीस अधीक्षक श्री .अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री .आयुष नोपाणी ,उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री .पंकज जाधव घनसावंगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.केतन राठोड स्थानिक गुन्हे शाखेची अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार गोपाल घोषित फुलचंद गव्हाणे ,श्रीकांत आहेर ,सागर बाविस्कर देविदास भोजने, सतीश श्रीनिवास ,संदीप चिंचोले तसेच घनसांगी पोलीस ठाण्याचे अंमलदार रंजीत वैराळ, सुनील वैद्य, प्रकाश पवार ,धनश्री गवळे ,गंगाराम कदम इत्यादींनी केली आहे.

Previous articleस्वतःच्याच जमिनीवर घरकुल बांधण्यास आदिवासी कुटुंबावर अमानुष अत्याचार..!!
Next articleनगर परिषद कंत्राटदार संतोष लांजेवार यांच्यावर गुन्हा दाखल; पोलिस कारवाईला सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here