Home जालना कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

25
0

आशाताई बच्छाव

1001233685.jpg

 

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

जालना, दि. 12 (जिमाका) :- जिल्ह्यात “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान, कुष्ठरोग निवारण दिन व जनजागृती पंधरवाडा दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. कुष्ठरोगविषयक संदेश जनसामान्यांपर्यत पोहोचवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्हास्तरीय खुली “रन फॉन लेप्रसी” मॅरेथॉन  स्पर्धेचे आयोजन दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातून “रन फॉन लेप्रसी” मॅरेथॉन  स्पर्धेला सुरुवात होवून सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद मार्गे अंबड चौफुली, सतकर कॉम्प्लेक्स ते जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथून सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयात मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला.

सहभागी स्पर्धकांमधुन पुरुष गटात वैभव राजेंद्र शिंदे, आकाश रामेश्वर राठोड,  सचिन मोहन चव्हाण यांची अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली.  तसेच महिला गटात प्रियंका लालसु ओकसा, शुभांगी वैजिनाथ म्हसलेकर, वैष्णवी बळीराम सोनटक्के यांची अनुक्रमे प्रथम, व्दितीय तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली. त्यांना रोख रक्कम पुरुष व महिला गटास अनुक्रमे 4 हजार रुपये, 2 हजार 500 रुपये, 1 हजार 500 रुपये व प्रशस्तीपत्र याप्रमाणे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के, डॉ. एन.जी. पवार, वैद्यकिय अधिकारी डॉ. आर.यु. काकड,   डॉ. जिल्हा हिवताप अधिकारी राहुल राऊत, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सुधाकर शेळके, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here