आशाताई बच्छाव
स्नेहलच्या अपघातातील धक्कादायक माहिती समोर
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलढाणा, 13 फेब्रुवारी त्या अपघातातील वाहनाबाबत युवा मराठा न्यूज कडे धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या माहितीवर पोलिसांनी ही गांभीर्याने लक्ष दिले आहे की नाही याविषय शंका आहे. रस्त्यावर धावणारे वाहन हे सुरक्षित असणे आवश्यक आहे. अन्यथा बिघाड असलेल्या वाहनांमुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका असतो. बरेच वाहनचालक देखभाल दुरुस्तीकडे डोळेझाक करतात. त्यासाठीच फिटनेस प्रमाणपत्र आहे.
वाहनांमध्ये छोटासाही बिघाड मोठे संकट ठरू शकते. विशेष करून प्रवासी व मालवाहू वाहनांची फिटनेस तपासणी सक्तीने करणे आवश्यक आहे. त्रिशरण चौकात झालेल्याा
आपघातातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या अपघातातील वाहन एमएच 28 एबी 1188 हे वाहन 12 वर्ष 2 महिने जुने आहे. त्या वाहनाची नोंदणी दिनांक 4 डिसेंबर 2012 ते फिटनेस व्हॅलिड 29 जून 2022 आहे. तर विम्याची मुदत 15 मे 2023 राजी संपलेली आहे. पीयुसीसी ची मुदत 8 ऑगस्ट 2022 रोजी संपलेली आहे. फिटनेस प्रमाणपत्र युवा मराठा न्यूज कडे प्राप्त झाले
आहे. त्यामध्ये वाहनाचे व्हेईकल सर्टिफिकेटमध्ये फिटनेस एक्सपायर दाखविले आहे. असे असतांना सुध्दा ते वाहन रस्त्यावर धावत आहे. त्यामुळे सहाजिकच एकीकडे वाहतूक सुरक्षा सप्ताह राबविला जात असतांना प्रशासन अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे.
स्नेहलला न्याय मिळावा यासाठी आज बुलढाण्यात कँडल मार्च काढण्यात येणार आहे. त्याबाबत बातमी प्रकाशित झाल्यानंतर जनमानसात स्नेहलला न्याय मिळाला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना दिसून आली आहे. समाज मनसुन्न करणारी भीषण अपघाताची घटना 10 फेब्रुवारी रोजी 12 वाजेदरम्यान त्रिशरण चौकात घडली होती. आज गुरुवार, दिनांक 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता चांडक ले-आऊटच्या बोर्डापासून ते त्रिशरण चौकापर्यंत कँडल मार्च काढण्यात येणार आहे.