आशाताई बच्छाव
वाळूचा हायवा सोडवण्यासाठी तहसीलदार यांचा बनावट आदेश तयार करणाऱ्या वाळू माफिया चंदनझीरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 14/02/2025
पोलीस ठाणे चंदंजिरा येथे यांनी पकडलेल्या हायवा निगराणी साठी लावलेला असताना आरोपी गोपाल नारायण सांगळे राहणार पोखरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना याने तहसीलदार यांचे बनावट शिक्के व बनावट स्वाक्षरी करून खोटा आदेश तयार केला पोलीस ठाणे चंदनझीरा येथे तो खरा असल्याचे भासूनवून वाळूचा हायवा सोडून घेऊन गेल्याने सदर प्रकरणात पोलीस स्टेशन चंदनझीरा येथे गुरनं.59/2025 कलम 420,467,468, 471भा.द.वी.प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आरोपी बेड्या ठोकल्या आहेत. सदर आरोपी ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे हसनाबाद येथे वाळू चोरीचे सात गुन्हे दाखल असून पोलीस ठाणे तालुका जालना व चंदनझीरा जालना येथे सुद्धा गुन्हे दाखल आहेत आरोपीस ताब्यात घेऊन अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी साहेब त्यांचे मार्गदर्शनाखाली प्रो.डी.वाय.एस.पी. करिष्मा चौधरी मॅडम, पोस्टे हसनाबाद चे सहा. पोलीस निरीक्षक संजय अहिरे, पोस्टे चंदनझीरा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस हवालदार कृष्णा तंगे, उत्तम देशमुख, रवी देशमुख, सागर खैरे, नवनाथ पाटील गणेश नाईकवाडे स्थागुशाचे सागर बाविस्कर यांनी सदरचीची कारवाई केली.