आशाताई बच्छाव
प्रेरणादायी! ‘आले तुफान किती.. जिद्द ना सोडली.. झेप घेतली आकाशी.. स्वप्ने झाली पुरी’ – भाजी -विक्रेत्याची मुलगी झाली मुंबई पोलीस !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मलकापूर पांग्रा येथून जवळच असलेल्या ढोरवी गावातील घटना जिद्द आणि मेहनतीचे बळ लाभले की, यशाचे शिखर गाठता येऊ शकते.. हे एका भाजीपाला विक्रेत्याच्या जिद्दी मुलीने दाखवून दिले असून समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे. मलकापूर पांग्रा येथून जवळच असलेल्या ढोरवी गावामधील एका गरीब कुटुंबातील शितल दशरथ सोळंके या मुलीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीची परीक्षा देऊन आपले यश साध्य केले.
घरची परिस्थिती बेताची असल्याने तिचे शिक्षण जवळ असलेल्या मलकापूर पांग्रा या गावी झाले. १२ वि नंतर तिथेच असलेल्या संकल्प क्लासेस येथे पोलीस भरतीची तयारी केली शेतात काम करीत तयारी सुरू ठेवली. रात्र आणि दिवस अभ्यास करत आपले यश गाठले. या यशामुळे गावातील नागरिकांनी तिचा सत्कार केला. या वेळी शितलचे वडील दशरथ बाबुराव सोळंके भाजीपाला विकून उदरनिर्वाह पोलीस भरतीमध्ये शितलची निवड झाल्यामुळे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी संकल्प क्लासेसचे शिक्षवृंद तसेच गावातील सरपंच नितीन पवार, पत्रकार ज्ञानेश्वर कळकुंबे, संदीप मुरकुट, गणेश शिंदे, विठ्ठल मुरकुट, संजु मुरकुट, सुखदेव सोळंके, सिध्देश्वर सोळंके, गजानन सोळंके, सतीश मुरकुट, गणेश सोळंके, भीमराव साळवे, श्री जंगम विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.