Home बुलढाणा क्राईम ! तकदीरसिंगचे तकदीर काही काळच चमकले! “चांदीची चमकच त्याला जेलात घेऊन...

क्राईम ! तकदीरसिंगचे तकदीर काही काळच चमकले! “चांदीची चमकच त्याला जेलात घेऊन गेली!”

27
0

आशाताई बच्छाव

1001225952.jpg

क्राईम ! तकदीरसिंगचे तकदीर काही काळच चमकले! “चांदीची चमकच त्याला जेलात घेऊन गेली!”
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा लोणार येथील सराफा दुकानातील झालेल्या चोरीची उकल करण्यात लोणार पोलीस व एलसीबी ला यश आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तकदीरसिंग टिट्टूसिंग टाक 32 रा. गुरुगोविंद नगर तालुका जिल्हा जालना असे या चोरट्याचे नाव आहे. आरोपीने लोणार व रिसोड (वाशिम) येथे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.तकदीरसिंग टिट्टूसिंग टाक या अट्टल चोराने लोणार येथील सराफा दुकानातून 26 किलो 15,30,000 रुपये किमतीची चांदी, 12 हजार रुपये रोख वइतर साहित्य असा एकूण 15,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. सध्या हा मुद्देमाल हस्तगत झालेला नाही. मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई लोणार पोलीस आणि बुलढाणा एलसीबी चे पथकांकडून करण्यात आली.

Previous articleजलसमाधी आंदोलना पूर्वी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे व कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात..!
Next articleहा असा कसा बाप? स्वतःच्या मुलीला नको ते व्हिडिओ दाखवले अन् अब्रूचे लचके तोडले…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here