आशाताई बच्छाव
जलसमाधी आंदोलना पूर्वी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे व कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात..!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मलकापूर जलसमाधी आंदोलना पूर्वी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे व कार्यकर्त्यांना घेतले जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे व कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात. शेतकरी कर्ज माफी, पीक विमा, दुष्काळी अनुदान या साठी पूर्णा नदीत संघटनेचे कार्यकर्ते घेणार होते जलसमधी..
विधानसभा निवडणुक होऊन तीन चार महिने झाले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द अजूनही पाळला नाही. शेतकऱ्याना कर्ज माफी केली नाही. महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन मत मिळविली व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा घात केला. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, अद्यापही शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही. राज्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटांनी घेरला असून त्यात सरकारची धोरणे शेतकऱ्यांविरोधी ठरत आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा असून महाराष्ट्र सरकारने ध्यानात ठेवाव. सरकारने या करावं अन्यथा तुम्ही कितीही आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करा, आम्हाला अटक करून जेलात टाका, ताब्यात घ्या आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येणारच वेळप्रसंगी लाठया काठया खाण्यासाठीही मागे हटणार नाही. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत स्वाभिमान शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी लढा सुरूच ठेवणार .
या वेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, नांदुरा तालुका अध्यक्ष गोलू पाटील, रामदास वाघ, सदानंद जुमडे, नितीन वानखेडे, निंबाजी तायडे, योगेश लांजुळकर, निखिल पाटील, तुषार लांजुळकर, शिवा पाटील गजानन पाटील, राजू इंगळे, गोकुळ हतळकर, सागर चांदेलकर, शेषराव हतळकर आश्विन धुमाळे, मारोती रजगुरे, दिलीप कायकुटे इत्यादी कार्यकर्ते हजर होते