आशाताई बच्छाव
महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार कारवाई करा
चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी
जालना । दिलीप बोंडे ब्युरो चीफ- छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांविषयी अत्यंत अश्लिल व अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता राहुल सोलापुरकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार कारवाई करावी व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी जालना जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन शासकीय समिती सदस्य चंद्रकांत नाथराव रत्नपारखे यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेता राहुल सोलापुरकर नावाच्या इसमाने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेउकर या दोन महापुरुषांविषयी अत्यंत अश्लिल व अशोभनीय वक्तव्य केले आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे दंगलीची परिस्थिती तयार निर्माण झाली आहे. व अनुसूचित जातीच्या लोकांच्या मनाला पिडा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करून त्यास तात्काळ अटक करण्यात यावी.
महापुरुषांच्या अवमानाची राज्यात मालिका सुरु झाली आहे. त्या प्रकरणी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी व ती जनतेत प्रकाशित करावी व आतापर्यंत जे अवमानाचे प्रकार झाले आहेत. त्याप्रकरणी सरकारने काय कार्यवाही केले आहे? त्याची माहिती सरकारने जनतेस द्यावं, सततच्या असंसदीय वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे अशांविरोधात उपाययोजना म्हणून सरकारने महामानव सन्मान व अवमान विरोधी कायदा करावा व तो कायदा हा देशद्रोह या कलमात जोडावा अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.