आशाताई बच्छाव
फॅन्ट्सी किड्स स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: जालना शहरातील मुक्तेश्वर द्वारजवळील फँटसी किड्स झोन स्कुलचे
वार्षिक स्नेहसंमेलन ८ फेब्रुवारी रोजी मुक्तेश्वर मंगल कार्यालय येथे
उत्साहात संपन्न झाले. यावेळी बालचिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध
नव्या-जुन्या गितांवर बहारदार नृत्य सादर करुन उपस्थित मान्यवरांसह
पालकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या योगा शिक्षीका शिल्पा शेलगावकर
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ विधिज्ञ बलवंत नाईक, अॅड. दिपक
नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी शाळेतील संचालिका
छाया नाईक, शिक्षिका योगिता शिराळकर, अल्पना पूरी,ज्योती अग्निहोत्री,
प्रियंका बिडवे, रेखा राऊत यांनी परिश्रम घेतले.
००००००००
फोटो ओळी…..
११-जालना शहरातील मुक्तेश्वर द्वारजवळील फँटसी किड्स झोन स्कुलचे वार्षिक
स्नेहसंमेलन मुक्तेश्वर मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाले.