Home भंडारा कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होणार :- प्राचार्य – राहुल डोंगरे

कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होणार :- प्राचार्य – राहुल डोंगरे

124
0

आशाताई बच्छाव

1001223063.jpg

कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होणार :- प्राचार्य – राहुल डोंगरे
( शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे प्रतिपादन)

 

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी )कॉपीमुक्त अभियानामुळे परीक्षा तणावरहीत वातावरणात पार पाडता येईल .या अभियानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. परीक्षेला समोर जाताना मंडळ सूचनाचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मी सातत्याने अभ्यास करीन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन , तसेच परीक्षेत आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणाव विरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आई-वडिलांचे, गुरुजनांचे नाव उज्वल करेन, असा संकल्प विद्यार्थ्यांनी घ्यावा.जेणेकरून कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होईल.मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार होऊ शकतो हा आशावाद निर्माण होऊन सृजनशील व सुसंस्कृत पिढी तयार होईल,असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.ते शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे आयोजित विद्यार्थी – पालक – शिक्षक ” विचार मंथन ‘ सभेत अध्यक्ष पदावरून बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सौ जयश्री गभने, पालक शिक्षक संघाचे सहसचिव राजेंद्र सिंदपुरे उपस्थित होते.
विद्यार्थी- शिक्षक- पालक यांच्याशी विचार मंथन सभेमध्ये संवाद साधताना प्राचार्य राहुल डोंगरे म्हणाले की राज्यात कॉपीमुक्त अभियानाचे अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. यासाठी जनजागृती मोहीम, पोलीस बंदोबस्त ,विद्यार्थ्यांची झडती ,महसूल विभागांची बैठकी पथके, भरारी पथके, जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दौरे होणार आहेत. 100% विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेश यावेळी तपासणी होणार आहे. पूर्णवेळ बैठक पथक नेमण्यात येणार आहेत. परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी केंद्र संचालक , पर्यवेक्षक व परीक्षेची संबंधित व्यक्तीनी या गैरमार्गावर आळा घालण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी परीक्षा कक्षातील हालचालींवर लक्ष केंद्रित करणे आमची नैतिक जबाबदारी आहे.पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना सकारात्मक हितोपदेश करावा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच खुणगाठ बांधावी की,” मी कॉपी करणार नाही.” नक्कीच शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कॉपीमुक्त अभियानाला गालबोट लावणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा सुद्धा यावेळी लावण्यात येणार आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टीला बळी पडू नये. विद्यार्थी – शिक्षक – पालक यांनी भयमुक्त वातावरणात कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सौ.जयश्री गभणे आणि सहसचिव राजेंद्र सिंदपुरे , कु.ज्योती बावनकर, दिपक गडपायले, नितुवर्षा मुकुर्णे यांनी विद्यार्थ्यांना ” उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी , सनदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी,आदर्श विद्यार्थी – नागरिक ” बनण्यासाठी कॉपीमुक्त अभियान यशस्वी करा,असा हितोपदेश केला.संचालन व आभार प्रदर्शन श्रीराम शेंडे यांनी केले. विचार मंथन सभेत विद्यार्थी – पालक -शिक्षक उपस्थित होते.

Previous articleपरळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांचा अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने सत्कार संपन्न!
Next articleमा एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सातवे गावात मोफत शिबिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here