आशाताई बच्छाव
मंठा येथे मा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 10/02/2025
याविषयी सविस्तर माहिती अशी की, मंठा येथे मा. खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त कुलदीप बोराडे मित्र मंडळ यांच्या वतीने दिनांक 11/ 02 /2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये 18 वर्षे वयोगटातील तसेच त्यापुढील सर्व वयोगटातील रक्तदाता रक्तदान करू शकतो असे आवाहन कुलदीप बोराडे मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. रक्तदान करण्यासाठी इच्छुक बांधवांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करून रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे. रक्तदान करण्यासाठी स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय मंठा तालुका मंठा जिल्हा जालना येथे व्यवस्था करण्यात आली असल्याचे आवाहन आयोजक कुलदीप बोराडे मित्र मंडळ मंठा यांच्या वतीने करण्यात आले आहे.