आशाताई बच्छाव
घरफोडी करून पसार झालेल्या आरोपीस अवघ्या काही तासातच अड्याळ पोलिसांनी अटक करून गुन्हा उघडकीस आणला
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )फिर्यादी नामे धनराज कवडू कायते वय 52 वर्षे राहणार टेकेपार तालुका जिल्हा भंडारा हे एक शेतकरी असून शेती बरोबरच ते भाजीपाला वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांना त्याचे भाजीपाला व्यावसायिक करिता बोलोरो पिकप वाहन घ्यायचे असल्यामुळे त्यांनी थोडे थोडे करून 1,40000 हजार रुपये जमा करून आपले टेकेपार येथील राहते घरी बेडरूम मधील लोखंडी अलमारीत एका काळ्या रंगाच्या बॅग मध्ये ठेवले होते . दिनांक7/2/2025 रोजी 10.30 सुमारास ते त्यांच्या परिसरात त्यांचे बँक खाते मधील पैसे काढण्याकरता म्हणून सहपरिवार लाखनी येथे बँकेत गेले होते. व दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घरी परत आले. असता त्यांना त्यांचे घरचे बेडरूम मधील दाराचा कुलूप तुटलेला दिसला व बेडरूम मधील सामान अव्यवस्थित दिसल्याने त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी वेळीच पोलीस स्टेशन येथे फोन करून त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती दिली. यावरून घड्याळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे त्यांचे स्टाफ सह मौजा टेकेपार येथे घटनास्थळी हजर झाले .त्यांनी फिर्यादी व आजूबाजूला चौकशी करून मोक्यावर डाग स्कॅन व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना प्राचारण केले .त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांनी घर शेजारी भुरट्या चोरी करणारा मुलगा नामे पियुष रवींद्र जगनाडे वय 20 वर्षे राहणार टेकेपार तालुका जिल्हा भंडारा ह्याच्यावर संशय दर्शविल्याने ठाणेदार धनंजय पाटील पोलीस स्टेशन यांनी वेळीच सदर घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन यातील संसहित आरोपी बाबत सायबर पोलीस स्टेशन भंडारा यांच्याकडून तांत्रिक माहिती प्राप्त करून आरोपी हा नागपूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने ठाणेदार धनंजय पाटील हे त्यांचे तपास पथकासह नागपूर येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्याला गांधीबाग नागपूर येथून ताब्यात घेतले. व पोलीस स्टेशन अड्याळ येथे परत घेऊन आले .फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 26/ 2025 कलम 131 (3) 305 (अ )भादवी अन्वये नोंद करण्यात आला. सदर आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सदर चोरी केल्याचे सांगितले व आरोपीचे ताब्यातून नमूद गुन्ह्यात घरपोडी करूनच चोरी केलेली पूर्ण रक्कम रुपये 1,40 000 हजार एवढी रक्कम जप्त करण्यात आली आहे . पुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासातच पोलिसांनी जेहरबंद करून शंभर टक्के गुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .सदर कारवाई ही ही जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन भंडारा,अप्पर पोलीस अधीक्षक कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील ठाणेदार अड्याळ, पोलीस उपनिरीक्षक मांदाडे ,पोलीस हवालदार रहांगडाले ,पोलीस शिपाई जितेंद्र वैद्य ,पोलीस शिपाई निर्माण ,पोलीस शिपाई बोरकर , सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथील तांत्रिक पोलीस हवालदार दिनेश आंबेडारे ,व शैलेश बेंदूकर यांनी केलेली आहे.