आशाताई बच्छाव
महासमाधी भूमी रुयाड सिंदपुरी पवनी येथे महाविहाराच्या वर्धापन दिनानिमित्त महिला अधिकार , व डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने भोजनदान कार्यक्रम संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) दिनांक 8 फरवरी 2025 ला दुपारी दोन वाजता महासमाधीभूमी धम्मोत्सव महाविहाराच्या वर्धापन दिनानिमित्त महिला अधिकार सामाजिक संघटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना व विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने बाहेरून आलेल्या पर्यटकांकरिता जेवणाची सुविधा करण्यात आली होती. या भोजनदान कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या हस्ते करण्यात आले , भदंत धम्मसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत मातारमाई ,सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदानंद धारगावे, उपाध्यक्ष नम्रता बागडे, जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई ,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, शांतीवन बुद्ध विहाराचे संस्थापक संचालक जीवनबोधी बौद्ध, उपसरपंच हेमंत मेंदवाळे,प्राध्यापक सुरेश खोब्रागडे, पंचायत समिती सदस्य बादल ठवरे,प्राध्यापक गजभिये जीवनबोधी बौद्ध सुधाकर भेलावे गोंदिया दिनेश बिसेन गोंदिया, आचार्य पांडुरंग नंदागवळी, सुरेश फुले, माझी पीएसआय यादवराव गणवीर साकोली, मनीषाताई भांडारकर, शितल नागदेवे. मनिशा खोब्रागडे, सीमा काळे ,सीमा सुखदेवे, प्रज्ञा नंदेश्वर,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पौर्णिमा खांडेकर, तनुजा नागदेवे, लीला भेलावे, माया जांभुळकर, अनिता भेलावे, वैशाली मेश्राम, ममता चंद्रिकापुरे, कोयल चंद्रिकापुरे, प्रज्ञा रंगारी, अस्मिता नगराळे, अर्चना गजभिये, श्रीदेवी बनकर, सुरेखा चहांदे, कांचन धनविजय, दत्तू धारगावे, संघरत्न बोरकर ,भारत मेश्राम, रोहित खोब्रागडे, प्रशिक लोणारे, संजय मोहनकर , लंकेश धारगावे , साहिल हुमणे, बबलू शहारे यांनी सहकार्य केले वरील भोजनदानाचा जवळपास जवळपास 4 000,हजार पर्यटकांनी आस्वाद घेतला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सिंदपुरी रुयाळ पवनी,येथील सरपंच ,उपसरपंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले.