आशाताई बच्छाव
साकोली येथे सरपंच ,सदस्य यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण
गावाच्या विकासाकरिता ग्रामपंचायत व लोक सहभाग महत्वाचा -भावेश कोटांगले ग्रा.प.सदस्य
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)आशीर्वाद सभागृह साकोली येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत पंचायतराज प्रशिक्षण केंद्र व जिल्हा परिषद भंडारा उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी यांच्या वतीने साकोली पंचायत समिती , विकास अधिकारी , तसेच पंचायत समिती अंतर्गत सरपंच उपसरपंच , सदस्य यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण पंचायतराज नागपूर चे प्राचार्य अभय बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ ते ८ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसीय कालावधीत संपन्न झाले.
या प्रशिक्षनाला तीन दिवसात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ७३ वि घटना दुरुस्ती,पंचायतराज चे बळकटीकरण, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मासिक, सभा, ग्रामसभा,१ ते ३३ नमुने , ग्रामपंचायतच्या विविध कलमा, ,ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य अधिकारी, ग्रामपंचायत उत्पनाचे साधने, आणि अंदाज पत्रक ,लेखापरीक्षण, आणि सामाजिक लेखा परीक्षण, शास्वत विकासाचे उद्दिष्ट्ये , जलजीवन मिशन, आमचा गाव आमचा विकास ग्रामपंचायत विकास आराखडा, व विधिध शासकीय योजनांची माहिती तीन दिवशीय प्रशिक्षणात सांगण्यात आली.
त्यावेळी प्रशिक्षक म्हणून रिता सुखदेवे, रत्नमाला वैद्य, रोहिणी मुन, विजय भुरे माजी विस्तार अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
तसेच अल्का रामटेके यांनी सत्र समन्वयक म्हणून प्रशिक्षण यशस्वी रित्या पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले.
या प्रशिक्षणात पंचायत समिती साकोली मधील सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.