आशाताई बच्छाव
अवैद्य तलवार बाळगणाऱ्या आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 08/02/2025
जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे तलवार ची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पत्रकार सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले.
दिनांक 07/02/2025 रोजी माननीय पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना गुप्त माहिती मिळाली होती इसम नामे फैजान शेख नासिर व 18 वर्ष हनुमान मंदिर जवळ इंदिरानगर जालना हा तो राहत असलेल्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी याकरिता हातात तलवार घेऊन फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेची पथक सदर घेत असताना तो त्याचे राहते घरी मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून दोन 2000 किमतीची एक धारदार तलवार जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे कधी जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचे कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री .अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनंत कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनी श्री. योगेश उबाळे ,पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र वाघ, पोलीस आमदार रमेश राठोड, रामप्रसाद पव्हरे, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर ,इरशाद पटेल, सतीश श्रीवास सर्व स्थागुशा यांनी केली आहे.