Home बुलढाणा क्राईम ! महिलेला मारहाण केली अन् गळ्यातील सोन्याची पोथ घेऊन पळाला !...

क्राईम ! महिलेला मारहाण केली अन् गळ्यातील सोन्याची पोथ घेऊन पळाला ! – चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या ! – एक लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त !

25
0

आशाताई बच्छाव

1001213436.jpg

क्राईम ! महिलेला मारहाण केली अन् गळ्यातील सोन्याची पोथ घेऊन पळाला ! – चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या ! – एक लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- जळगाव जामोद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जामोद व सोनाळा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल करून, तब्बल 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल
जप्त करीत एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्यात. काझी मजहरोद्दीन झुबेरोद्दीन 36 रा. राणी पार्क जळगाव जामोद असे या आरोपीचे नाव आहे.
हकीकत कशी आहे की, फिर्यादी शालू धम्मपाल दामोदर रा. खेडा खुर्द तालुका जळगाव जामोद ह्या 8 डिसेंबर 2024 रोजी शेतात जात असताना, आरोपीने त्यांचा रस्ता अडविला आणि मारहाण करून जबरदस्तीनेत्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याचे मनी असलेली पोथ व मोबाईल घेऊन पोबारा केला होता. इतरांकडून देखील चार ग्रॅम सोन्याची पोत जबरीने चोरून नेली होती. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सदर चोरट्याला जेरबंद केले आहे. चोरट्या कडून सोन्याचे मणी व ईतर वजन
6.960 ग्रॅम किं. 42,000, एक मोटार सायकल 60,000, दोन मोबाईल असा एकूण 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या पथकाने केली कामगिरी !
सपोनि. रुपेश शक्करगे, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, गणेश पाटील, चाँद शेख, पोकॉ. गोपाल तारुळकर चालक पोकॉ. पुंड स्था.गु.शा. बुलढाणा व पोहेकॉ. राजू आडवे, पोकॉ. ऋषीकेश खंडेराव तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांनी केली.

Previous articleभूतदया! ती कॉलमच्या खड्यात पडली अन्….!
Next articleमराठी पत्रकार परिषद संलग्न संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी ज्ञानेश्र्वर दांदळे उपाध्यक्ष शेख अब्दुल,सचिव विवेक राऊत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here