आशाताई बच्छाव
खळबळजनक ! अल्पवयीन मुलीला संत्र्याच्या मळ्यात नेले.. मग नको ते केले !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- संग्रामपूर तालुक्यातील एका गावात संत्र्याच्या मळ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यात उघडकीस आली आहे.
वृत्त असे कि, एका गावातील रहिवासी अल्पवयीन मुलगी वय अंदाजे साडे ४ वर्ष हिला एका २१ वर्षीय भामट्या नराधामाने दुसऱ्या गावात असलेल्या संत्र्याच्या शेत शिवारात घेऊन गेला. तसेच त्या शेतात तिच्या सोबत लैंगीक अत्याचार केला. अत्याचार प्रकरणी सुनील कालुसिंग निगवाले वय २१ रा. डोईफोडिया (मध्यप्रदेश) या नराधामावर सोनाळा पोलीस ठाण्यात अपराध कायमी नं.३०/२०२५ कलम ६४ (२) (च) (झ), ६५, ६५ (२) भा.न्या.सं.२०२३ सहकलम ४,५ (१) (M) (N), 6, 8 पोक्सो २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पुढील तपास सोनाळा सपोनि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पो. उपनिरीक्षक महादेव खोने, पोकॉ. परमेश्वर तितरे, पोकॉ. राहुल पवार करत आहे.