Home बुलढाणा बांग्लादेशातील वाढत्या छळाविरोधात बुलढाण्यात आवाज बुलंद ! – बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम...

बांग्लादेशातील वाढत्या छळाविरोधात बुलढाण्यात आवाज बुलंद ! – बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक तथा चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता म्हणाले…

46
0

आशाताई बच्छाव

1001033659.jpg

बांग्लादेशातील वाढत्या छळाविरोधात बुलढाण्यात आवाज बुलंद ! – बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक तथा चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता म्हणाले…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बांग्लादेशात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. बांग्लादेशातील वाढत्या हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या छळाविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आवाज बुलंद करण्यासाठी १० डिसेंबरला आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होत आवाज उठवावा असे आवाहन बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा
राधेश्यामजी चांडक तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले आहे.

बांगलादेशातील अत्याचार वाढत आहेत. मात्र याचा कुठे निषेध होतांना दिसत नाही. एरवी एखादी छोटी घटना कुठे घडली तर त्यावर अनेक ठिकाणांहून आवाज उठवल्या जातो, ओरड केली जाते. मात्र बांग्लादेशात सनातन हिंदू धर्माच्या अनुयायांवर एव्हढे अत्याचार होत असतांना निषेधाचे सुर उमटत नाहीत याचे आश्चर्य वाटते असे म्हणत मंगळवारी बुलडाणा येथे बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात हजारोंच्या
संख्येने सहभागी होत आवाज उठवावा असे आवाहन बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा भाईजी उपाख्य राधेश्यामजी चांडक यांनी केले आहे. तर याच अनुषंगाने चिखली अर्बनचे सतीश गुप्त यांनी सुद्धा आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. बांग्लादेशात हिंदू व इतर सर्व अल्पसंख्याकांवर होणाऱ्या जिहादी अत्याचाराच्या निषेधार्थ बुलडाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने १० डिसेंबरला आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता गर्दै सभागृहातून हा मोर्चा तहसील चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here