आशाताई बच्छाव
आज आक्रोश – न्याय मोर्चात हिंन्दु समाज बांधवांनी सहभागी व्हावे … शिवसेना नेते तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलडाणा बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने बुलडाणा येथे, आज १० डिसेंबरला आक्रोश न्याय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री
प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत. दररोज बलात्कार, खून, लुटमार, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना निंदनीय असून मानवजातीला काळीमा फासणाऱ्या आहेत. केवळ हिंदू आहेत म्हणून हा अत्याचार होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असून या घटनेचा निषेध नोंदणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बुलडाणा येथे आयोजित आक्रोश मोर्चात हिंदू बांधवांनी हजारांच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना नेते तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.