आशाताई बच्छाव
संवाद वाढवा
सध्या आभासी जगात सोशल मीडियावर तरुणाई धुमाकूळ माजवत आहे. सोशल मीडियामुळे समज-गैरसमज निर्माण होत आहेत. एकमेकांविषयी कटुता निर्माण होत आहे.पूर्वी खेड्यातील लोक सायंकाळी जेवण आटोपल्यावर पारावर गोळा व्हायचे. तिथे तासन् तास गप्पा रंगायच्या. त्यात एकमेकांबद्दल आदर, आपुलकी, संवादाचा गोडवा व समस्येची उकल होत असे.
सध्या आभासी जगात सोशल मीडियावर तरुणाई धुमाकूळ माजवत आहे. सोशल मीडियामुळे समज-गैरसमज निर्माण होत आहेत. एकमेकांविषयी कटुता निर्माण होत आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.
आजकाल घटना, प्रसंग काय आहे याचे भान न ठेवता समाज माध्यमावर चर्चा रंगतात, तर कधी मुद्दामच त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
आताच्या घडीला मात्र बाळाला यू-ट्यूबमधील गाणी, गेम व रिल्स बघायला वडीलमंडळी स्वतःहून प्रेरणा देत असल्याने त्यांचा मुलांशी संवाद तुटत आहे. अगदी लहान वयापासून मोबाईल वापरला जात असल्याने लहान मुलांत पाठीचे, मानेचे नि डोळ्यांचे आजार बळावत आहेत.
मैदानी खेळांमुळे शारीरिक सुदृढता वाढते. परंतु हल्ली शारीरिक खेळाऐवजी मुले मोबाईलवर गेम खेळत आहेत. आई-वडिलांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायला हवे, तेव्हाच तरुणाईची शारीरिक व मानसिक स्थिती योग्य राहील.
मोबाईलमधील विघातक गेममुळे बालकांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन आत्महत्येसारखे कृत्य घडत आहेत. काही वेळा तर ऑनलाइन सट्टाही खेळला जात आहे. मोबाईलमुळे व्यसनी, जुगाराच्या नादाला लागत आहेत.त्याच त्या विचारांच्या गर्तेत असल्याने एकलकोंड्याची समस्या निर्माण होऊन हिंसक वृत्ती फोफावत आहे. दोन मित्र किंवा आई-वडील, नातेवाईक जवळ बसलेले असताना देखील एकमेकांच्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसतात, ही स्थिती पुढील काळासाठी भूषणावह नसून भयानक आहे.त्यामुळे क्रियाशक्ती कमी होऊन उत्पादनावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आभासी जगात जगण्यापेक्षा वास्तवातील परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकायला हवं तेव्हाच जीवनमूल्ये, जीवनशिक्षण मिळेल अन्यथा आभासी जगात रममाण होऊन अधिक संवाद हरवत गेल्यावाचून राहणार नाही.आभासी जग आपल्यासाठी आहे आणि आपण आभासी जगासाठी नाही, हे प्रत्येकाने निश्चित केल्यास हरवत चाललेला संवाद वाढेल
✍🏿स्वप्निल देशमुख ( पत्रकार) राष्ट्रीय अध्यक्ष युवा मराठा महासंघ