आशाताई बच्छाव
क्राईम ! अवघ्या 24 तासात एलसीबीने लावला खूनाचा छडा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा ‘कानून के हात लंबे होते है’
हे पुन्हा एलसीबी पोलिसांनी दाखवून दिले. एलसीबीने अवघ्या 24 तासात खूनाचा छडा लावला आहे. ही त्यांची कामगिरी उल्लेखनीय म्हणावी लागेल!
किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत अनोळखी मृताची ओळख पटवून खून झाल्याचा छडा लावण्यात एलसीबी यशस्वी झाली असून एका मारेकराला अटक करण्यात आली आहे. रघुनाथ आत्माराम गवळी वय 30 राहणार नंदाना तालुका रिसोड जिल्हा वाशिम असे मृतकाचे नाव आहे. तर आरोपी नंदकिशोर आत्माराम गवळी वय 34 राहणार नंदना तालुका रिसोड जिल्हा वाशिम असे आरोपीचे नाव आहे.
किनगावराजा पोलीस स्टेशनला 8 नोव्हेंबर 2024
रोजी ग्राम दुसरबीड शिवारातील खडकपूर्णा नदीपात्रामध्ये अज्ञात आरोपीने एका अनोळखी व्यक्तीच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्राने मारून ठार केले होते तसेच पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्या व्यक्तीचे प्रयत्न लोखंडी ड्रम मध्ये टाकून खडकपूर्णा नदीत फेकून दिले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. एलसीबी पथकाने सदर गुन्ह्यातील अनोळखी मृतकाची ओळख पटवून आरोपीचा छडा लावला. सदर मृतक इसम हा व्यवसायाने वकील होता. आरोपी नंदकिशोर आत्माराम गवळी वय 34
राहणार नंदना तालुका रिसोड जिल्हा वाशिम याला पोलिसांनी शिताफीने अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने व हत्यार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे मृतक व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून आर्थिक व कौटुंबिक कारणाने वाद होते. या वादाचे रूपांतर विकोपाला गेल्याने मृतकाचा हत्याराने खून करण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत खडकपूर्णा नदीमध्ये फेकूण देण्यात आले. ही कामगिरी आशिष चेचरे, सचिन कानडे, प्रताप बाजड, राजकुमार राजपूत, शरदचंद्र गिरी दिनेश बकाले, पुरुषोत्तम आघाव, गजानन दराडे आदींनी केली आहे.