Home जालना शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना लाटत्तांनाच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत केलेल्या कोटयावधी...

शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना लाटत्तांनाच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत केलेल्या कोटयावधी रुपयांच्या भ्रष्टाचार

15
0

आशाताई बच्छाव

1000950055.jpg

जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना लाटत्तांनाच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत केलेल्या कोटयावधी रुपयांच्या भ्रष्टाचार कारभारामुळेच माजी राज्यमंत्र्यांना ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले असून हे आपण केलेल्या कर्माचे फळ असल्याची टीका इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी केली आहे.
जालना विधानसभा मतदार संघातील रामनगरसह अन्य गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी खा.डॉ. कल्याण काळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, मुरलीधर थेटे, शिवाजीराव शेजुळ, राजेंद्र राख, विजय चौधरी, हरिहर शिंदे, गोपाल मोरे, राम शेजुळ, विष्णू पडूळ, दामोधर सोनवणे, युवराज राठोड, संदीप खरात, ज्ञानेश्वर डुकरे, अंजेभाऊ चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना गोरंटयाल म्हणाले की, आपण मागील पाच वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले नाही तर ते कार्यान्वित देखील करून दाखवले. आज या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून भविष्यात जालना जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थ्याना त्याचा निश्चितपणे लाभ होणार आहे. रस्ते, सामाजिक सभागृह, गाव अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्र्नासह अनेक गावातील विकासाची कामे पूर्ण केली असून त्यामुळेच आपल्या मागे जनतेचे पाठबळ मिळत आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आता उध्दव ठाकरे यांची शिवसेना सोबत असल्याने ग्रामीण भागात देखील आपल्याला भरीव मतदान मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करून गोरंटयाल यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार खोतकरांवर टीकेची तोफ डागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here