आशाताई बच्छाव
वरवंड ते रुईखेड टेकाळे रोडचे काम निकृष्ट दर्जाच्ये रोडच्या दोन्ही साईटच्या नाल्याही अर्धवटच,अधिकारी आले आणि रोड पाहून गेले सर्व नियम धाब्यावरच……
युवा मराठा न्यूज बुलडाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– बुलडाणा तालुक्यातील वरवंड ते रुईखेड टेकाळे या हद्दीत चालू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागा यांच्याकडे वरवंड येथील प्रकाश जेऊघाले यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली होती वरवंड ते रुईखेड टेकाळे या हद्दीत मुख्यमंत्री ग्राम सडक रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे शासनाने दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. या कामामध्ये अनेक त्रुटी आहेत.हे काम अंदाजित किंमतः- रु. २५३.४० लक्ष कामाच्या अंदाजपत्रकानुसार
काम करण्यात आलेले नाही.तरी संबंधित कंत्राटदार मे. एस.आर.एल कंस्ट्रक्शन प्रा.लि., खासगाव, जि. जालना व कार्यान्वीत यंत्रणाः- कार्यकारी अभियंता, प्र.ग्रा.स.यो., म.ग्रा.र.वि. संस्था, बुलढाणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आत वरवंड येथील शेतकरी करणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने रुंदीकरण करत असताना मुरूम न वापरता काळी माती वापरण्यात आलेली आहे. जेएसबीची (खडीकरण) जाडी कमी केलेली असून डब्ल्यूबीएम केलेला नाही.साइड पट्ट्यांचे कठाणे मुरूमाने तात्पुरता भराव टाकण्यात आलेला आहे. रोडच्या साईडच्या नाल्याही काही ठिकाणी खोदलेल्या नाही. या रस्त्याचे ३० ते ४० फुट रुंदीकरण इस्टिमेटप्रमाणे करणे बंधनकारक असताना ते देखील करण्यात आलेले नाही.वरील सर्व मुद्द्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी वर्ग आता करणार आहे.