Home वाशिम ‘चला, मेळघाटमधील आपल्या भाऊबहीणींना मदतीचा हात देऊ या’’

‘चला, मेळघाटमधील आपल्या भाऊबहीणींना मदतीचा हात देऊ या’’

28
0

आशाताई बच्छाव

1000950000.jpg

‘‘चला, मेळघाटमधील आपल्या भाऊबहीणींना मदतीचा हात देऊ या’’ !

हिंदवी परिवार व छत्रपती तरुण मित्रमंडळाची तीनदिवसीय मेळघाट साहित्य वाटप मोहीम

दानशुरांनी कपडे, शैक्षणिक साहित्य आणून देण्याचे आवाहन

वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- दिपावलीचा शुभपर्वावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदवी परिवार, छत्रपती बहूउद्देशिय तरुण मित्रमंडळ व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या संयुक्त आयोजनातुन येत्या २०, २१ व २२ डिसेंबर रोजी मेळघाट येथे कपडे, औषधी व शैक्षणिक साहित्य वाटप मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. मेळघाटच्या दुर्गम भागात राहणार्‍या आपल्या भाऊबहीणींना साहित्य वाटपाच्या रुपाने मदतीचा हात देवून त्यांच्या जीवनात दिपावलीचा आनंद निर्माण करण्यासाठी दानशुर नागरीकांनी जुने नवे कपडे, शैक्षणिक साहित्य व औषधी आणून देण्याचे आवाहन हिंदवी परिवाराचे जिल्हाध्यक्ष दिलीप मेसरे यांनी केले आहे.

दिपावलीच्या काही दिवसामध्ये आपल्या जीवनात मिठाई, फटाके, नवे कपडे आदींच्या रुपाने लक्ष लक्ष दिव्यांच्या आनंद पेरला जातो. मात्र भारतातील आजही अनेक ग्रामीण व दुर्गम भागातील आपल्या बांधवांच्या जीवनात दिपावलीचा दिव्यांचा प्रकाश आनंदाच्या रुपाने पोहचत नाही. आजही अनेकांच्या नशिबी अठराविश्वे दारिद्रयात जगणे लिहीले आहे. अशा आपल्या भाऊ बहीणींना मदतीचा हात पुढे करुन खर्‍या अर्थाने दिपावलीचा आनंद घेण्यासाठी हिंदवी परिवार व छत्रपती तरुण मित्रमंडळाच्या वतीने आणि जिल्हयातील दानशुर व्यक्तींच्या सहकार्यातुन पहिल्या मोहीमेच्या अभूतपूर्व यशानंतर मेळघाट येथील दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासी बांधवांसाठी तीनदिवशीय साहित्य वाटप मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २०, २१ व २२ डिसेंबर रोजी ही मोहीम राबविल्या जाणार आहे. या मोहिमेत आपले योगदान देण्यासाठी आपल्या घरी टाकून दिलेले जुने कपडे, नवे कपडे, साड्या, लहान मुलांचे कपडे, पेन, पेन्सील, वह्या, कंपास आदी शैक्षणिक साहित्य, औषधी आदींचे संकलन करणे सुरु आहे. यासाठी विविध ठिकाणी पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये आरोग्य शिबीर, चष्मे वाटप, औषधी वाटप गरजेनुसार करण्यात येईल. तसेच योगा शिबीर व आपत्ती व्यवस्थापन शिबीर सुध्दा घेण्यात येईल. तरी या मोहिमेत ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी ५ ते ९ डिसेंबरपर्यत आपल्या नावाची नोंदणी करावी. साहित्यरुपाने मदत करावयाची असल्यास दानशुरांनी १५ डिसेंबरपर्यत संबंधीत स्वयंसेवकाजवळ आपले साहित्य जमा करावे. दानदात्यांनी आपल्या जवळील जुने कपडे धुवुन व प्रेस करुन द्यावे. तसेच साहित्य संकलनासाठी मर्यादीत दिवस ठेवण्यात आले असून त्यानंतर संकलन बंद करण्यात येईल. साहित्य जमा करण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील पदाधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक जाहिर करण्यात येतील. मोहिमेच्या अधिक माहितीसाठी दिलीप मेसरे जिल्हाध्यक्ष हिंदवी परिवार ९४२३६५१३०७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here