Home जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकुण 16 लाख 52 हजार 511 मतदार

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकुण 16 लाख 52 हजार 511 मतदार

19
0

आशाताई बच्छाव

1000909170.jpg

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची माहिती

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात

एकुण 16 लाख 52 हजार 511 मतदार

 

जालना, दि.31 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे.  या पार्श्वभूमिवर दि.1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत दि.29 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम यादीनुसार जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात पुरुष 8 लाख 60 हजार, स्त्री 7 लाख 92 हजार आणि तृतीयपंथी 42 मतदार अशी जिल्ह्यात अंतिम एकुण 16 लाख 52 हजार 511 मतदारांची संख्या आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.

दि.1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत दि.29 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सैन्य दलातील पुरुष 1 हजार 531 तर स्त्री 31 असे एकुण 1 हजार 562 मतदार आहेत. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात 18 ते 19 वयोगटातील पुरुष 25 हजार 489 तर स्त्री 15 हजार 565 आणि तृतीयपंथी 2 असे एकुण 41 हजार 56 उमेदवार आहेत. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात पुरुष 8 हजार 187 व  स्त्री 5 हजार 465 असे एकुण 13 हजार 652 दिव्यांग मतदार आहेत. तर वय वर्षे 85 पेक्षा अधिक असलेले एकुण 27 हजार 287 मतदार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील मतदार संघातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे तसेच ज्या ठिकाणी 1500 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात येवून नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत.

Previous articleविधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024  विधानसभा निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडावी
Next articleजालना जिल्हा विधानसभा मतदार संघाच्या पूर्वपिठीकेचे प्रकाशन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here