आशाताई बच्छाव
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
विधानसभा निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडावी
–निवडणूक निरिक्षक (सामान्य) वेद पती मिश्र
· केंद्रीय निवडणूक निरिक्षक यांनी घेतला विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
जालना,दि.31,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने निवडणूकीच्या अनुषंगाने चांगली पूर्वतयारी केलेली असुन, ही निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या गांभिर्यपूर्वक पार पाडण्याचे निर्देश 101-जालना, 102-बदनापूर (अ.जा.) आणि 103 भोकरदन विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र यांनी यावेळी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत श्री. मिश्र हे बोलत होते. यावेळी 99-परतूर आणि 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. नवीन, निवडणूक निरीक्षक (पोलीस) झेड ॲन विजया, निवडणूक निरीक्षक (खर्च) देव प्रकाश बमणावत जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, बीएसएफचे अजयकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.