Home जळगाव आज आ.मंगेश चव्हाण यांची ऐतिहासिक रॅली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन राहू...

आज आ.मंगेश चव्हाण यांची ऐतिहासिक रॅली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन राहू शकतात उपस्थित

58
0

आशाताई बच्छाव

1000896625.jpg

आज आ.मंगेश चव्हाण यांची ऐतिहासिक रॅली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन राहू शकतात उपस्थित
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
५० हजार जनतेच्या उपस्थितीत आणि लाडक्या बहिणींच्या हस्ते भरणार आ.मंगेश चव्हाण’ विधानसभा उमेदवारी अर्ज
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील –विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे आज २८ तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नामांकन रॅलीचे देखील नियोजन करण्यात आले असून सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होणार आहे तेथून पुढे जुने तहसील कार्यालय , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून गणेश रोड तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी मोठी रॅली काढण्यात येणार आहे.
मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या हस्ते यावेळी आमदार मंगेश चव्हाण हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून महायुतीच्या नेत्यांची देखील यावेळी उपस्थीती असणार आहे. आ.चव्हाण यांनी प्रचारात देखील मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई देखील त्यांच्या बरोबरीने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. आमदार चव्हाण यांच्या हिंगोणा गावातील नागरिकांनी तर सामुहिक शपथ घेऊन सगळं गाव चव्हाण यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व नागरीक यावेळी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहणार असून पन्नास हजारांहून अधिक मतदारांच्या हजेरीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. हि निवडणूक आता फक्त माझी एकट्याची नाही तर ही निवडणूक आता नागरिकांनी डोक्यावर घेतली आहे. म्हणून या ऐतिहासिक दिवशी मित्रपक्ष, नागरिक सर्वांनी सहभागी होऊन या दिवसाचे साक्षीदार बनावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

Previous articleऐतिहासिक शक्तीप्रदर्शन बघायचे असेल तर आज या ! -आमदार संजय गायकवाड यांचा उद्या नामांकन अर्ज दाखल होणार !
Next articleअभूतपूर्व शक्तीप्रदर्शन करत आमदार मंगेश चव्हाण यांनी फुंकला विजयाचा शंखनाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here