आशाताई बच्छाव
अवकाळी पावसामुळे जाफ्राबाद तालुक्यातील सोयाबीन,मका, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी-कृष्णा लहाने जिल्हाध्यक्ष अभाभ्रनिसंस
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 26/10/2024
ऑक्टोबर महिन्यात जाफ्राबाद तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने या परतीच्या पावसाने तालुक्यातील सोयाबीन,मका,कापूस व तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्या नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जालना जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा लहाने यांनी केली आहे.या संदर्भात ते लवकरच जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेऊन त्या संदर्भात निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले
तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले असून वादळी वाऱ्यासह पावसामुळे कपाशी, मक्का, तुर,जमिनीवर पडले असून कपाशीचे बोंड मोठ्या प्रमाणात पावसामुळे खराब झाले, तर मकाच्या कंसाला अंकुर फुटले असून शेतकरी बांधवांच्या हाता- तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. काही दिवसांवर सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी सण येत असल्याने व शेतकरी बांधवांचे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची यावर्षीची दिवाळी ही गोड होणार नसल्याने प्रशासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करून,या अगोदर शेतकऱ्यांचे विविध योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत परंतु बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे खाते होल्ड केल्याने त्या शेतकऱ्यांना त्या पैशाचा लाभ घेता येत नाही त्याचा निर्णय घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी व होल्ड केलेल्या शेतकऱ्यांना त्वरित पैसे देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जालना जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा लहाने यांनी केली आहे.