आशाताई बच्छाव
मुलीच्या वाढदिवसानिमित्य गरीब कुटुंबातील मुलांना कपडे आणी फराळाचे वाटप
मंगरुळपीर /वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ:-मंगरुळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांच्या वाय सी प्री प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये के.जी.-२ मध्ये शिकत असलेली कु.स्वरा या मुलीच्या वाढदिवसानिमित्य पाल ठोकुन राहत असलेल्या आणी दगडाचे काम करीत असलेल्या गरीब पाथरवट समाजातील लहान मुलांना नविन कपडे,दिवाळीचा फराळ तसेच त्यांच्या आईवडीलांना साडीचोळी व शेलाटोपी देवुन समाजात नवा आदर्श निर्माण करुन चिमुकल्यांच्या मनात लहानपणापासुनच समाजसेवेची जाण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.लहान मुलांना कनविन कपडे आणी फराळ मिळाल्यामुळे त्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वाहत होता.
आयुष्यात आनंद, सौख्य, प्रेमाची बरसात करणारा सण अर्थात दिवाळी. फटाक्यांची आतषबाजी, फराळाचा आस्वाद, रांगोळीचा सडा, लक्ष दिव्यांनी उजळून निघणारा आसमंत. आनंद, प्रेम आणि सुखाची उधळण करीत येणारा दीपोत्सव नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व कुटुंबातील ऋणानुबंधाची वीण घट्ट करतो. गरीब, निराधार आहेत, ज्यांना दिवाळी करणे शक्य नाही. त्या चिमुकल्यांनाही दिवाळी करता यावी, दिव्यांनी त्यांची झोपडी उजळावी म्हणून संवेदनशील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे असते यांचीच जाणीव मंगरुळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांनी निर्माण केली आहे.झोपडीत राहणाऱ्या गरिबांच्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिवाळी केल्याच्या आनंद त्यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्य गरीब कुटुंबांना मदत करुन साजरा केला आहे.सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम समाजात वाढण्यासाठी नेहमी प्रेरणादायी व समाजपयोगी ऊपक्रम राबवुन इतरांना प्रेरीत करण्याचे काम नेहमीच भगत परिवार करीत असते.मुलीच्या वाढदिवस आणी दिवाळीनिमित्य गरीब कुटुंबांतील मुलांना नवीन कपड्याचे वाटप केले तसेच दिवाळी फराळाचे वाटप केले.महागाईमुळे गरिबांना दैनंदिन गरजा भागवणे शक्य नाही. दिवाळी पैसेवाल्यांचा सण असा समज झाला आहे. तो काही अंशी खरंही आहे. मात्र संवेदनशील नागरिक व संस्थांनी गरीब चिमुकल्यांना दिवाळीचा फराळ, मिठाई, दैनंदिन वस्तू व कपडे भेट दिल्यास गरीबांना मोठी मदत होवु शकते.दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला नवीन कपडे खरेदी करण्याची उत्सुकता असते. मात्र, गरीब कुटुंबांना पोटाची खळगी भरताना नवीन कपड्यांची खरेदी करणे शक्य होत नाही.दिवाळी म्हटले, की नवीन कपडे, फटाके आणि खाऊ असे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते. सर्वसामान्य घरातील मुलांना त्यांचे आई-वडील बाजारात नेऊन ही खरेदी करून देतात. पण पालामध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांच्या मुलांना व अनाथ मुला-मुलिना दिवाळी खरेदीचा आनंद लुटला येत नाही म्हणून भगत परिवाराने मुलीच्या वाढदिवसाला हा प्रेरणादायी सामाजिक ऊपक्रम राबवुन नवा आदर्श निर्माण केला आहे.जे गरीब, निराधार आहेत, ज्यांना दिवाळी करणे शक्य नाही. त्या चिमुकल्यांनाही दिवाळी करता यावी, दिव्यांनी त्यांची झोपडीही आनंदाने उजळावी म्हणुन कु.स्वरा फुलचंद भगत या चिमुकलीचा वाढदिवस तिच्या परिवाराने स्वतः पालावर जावुन त्या कुटुंबांतील मुलांना नविन कपडे व फराळ देवुन साजरा केला.या ऊपक्रमामुळे झोपडीत राहणाऱ्या गरिबांच्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिवाळी केल्याच्या आनंद ओसंडुन वाहत होता.सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम समाजात वाढण्यासाठी नेहमी असे ऊपक्रम राबवले जातात.गरीब कुटुंबांतील मुलांना नवीन कपड्याचे वाटप केले.पुढाकार घेत गरिबांना दिवाळी फराळ व दैनंदिन गरजेच्या वस्तू झोपडीत जाऊन भेट दिल्या.या समाजपयोगी उपक्रमाचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.