Home बुलढाणा ब्रेकिंग – जयश्रीताईंच्या उमेदवारीने बुलढाण्यात तुल्यबळ लढतीची शक्यता बळावली! सोज्वळ आणि लढाऊ...

ब्रेकिंग – जयश्रीताईंच्या उमेदवारीने बुलढाण्यात तुल्यबळ लढतीची शक्यता बळावली! सोज्वळ आणि लढाऊ व्यक्तिमत्वाच्या धनी जयश्रीताई ठरू शकतात जायंट किलर !

53
0

आशाताई बच्छाव

1000889604.jpg

ब्रेकिंग – जयश्रीताईंच्या उमेदवारीने बुलढाण्यात तुल्यबळ लढतीची शक्यता बळावली! सोज्वळ आणि लढाऊ व्यक्तिमत्वाच्या धनी जयश्रीताई ठरू शकतात जायंट किलर !
बुलढाणा :- बुलडाणा विधानसभा निवडणुकांची रणदुंदुभी पेटल्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघात कोणा-कोणात लढत रंगणार याची प्रचंड उत्कंठा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. गल्लीबोळापासून ते मुख्य रस्त्यांपर्यंत निवडणुकीत काय होणार, याची एक मोठी चर्चा होती. अखेर २४ आक्टोबर रोजी या चर्चाना पूर्णविराम मिळाला, कारण विद्यमान आमदार तथा शिवसेना (शिंदे गट) उमेदवार संजय गायकवाड यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून शिवसेना (उबाठा) च्या उमेदवार म्हणून बुलढाण्यातील अत्यंत सोज्वळ, अभ्यासू आणि जनसामान्यांसाठी सातत्याने लढणाऱ्या लढाऊ अॅड.
जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी घोषित झाली.

जयश्रीताईंचे नाव घोषित होताच मतदारसंघात सातत्याने चर्चा रंगते आहे की, ही लढत अत्यंत तुल्यबळ होणार असून, विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली सगळी ताकद झोकून काम करावे लागणार आहे. जर या मतदारसंघात परिवर्तन झाले, तर बुलढाणा मतदारसंघाला पहिली महिला आमदार मिळु शकते. याशिवाय बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे गेल्या ३० वर्षांतील एक वैशिष्ट्य राहिले आहे की, या मतदारसंघात एकदा निवडून आलेला आमदार परत निवडून येत नाही. अपवाद फक्त विजयराज शिंदे यांचा आहे. विजयराज शिंदे हे २००४ आणि २००९
असे सलग दोनदा निवडून आले होते. हा अपवाद वगळता गेल्या ३० वर्षांत या मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळेच या वेळीदेखील ही परंपरा कायम राहते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

• जयश्रीताईंचा मोठा जनसंपर्क

गेल्या सुमारे २० वर्षांपासून अॅड. जयश्रीताई शेळके या सार्वजनिक जीवनात अत्यंत सक्रिय आहेत. जिजाऊ ब्रिगेडपासून आपल्या कार्याची सुरवात त्यांनी केली होती. जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने संघर्ष केला. मराठा सेवा संघाद्वारे घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमात त्या नेहमीच
सक्रिय असायच्या. राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन जयश्रीताई सातत्याने कार्य करीत आहेत. पुढे जाऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. तेंव्हापासून त्या अत्यंत निष्ठेने काँग्रेससोबतच राहिल्या. २०१४ पासून जेंव्हा देशात आणि राज्यात भाजपची लाट आली होती आणि काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपची वाट पकडली, तेंव्हाही जयश्रीताई या खंबीरपणे आणि निष्ठेने काँग्रेसमध्येच राहिल्या.

सध्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेकडेच राहील, अशी शक्यता होती. जयश्रीताई
यांचे कार्य, त्यांचा मतदारसंघातील प्रभाव, कामाचा झंझावात आणि जनसामान्यांप्रति असलेला कळवळा पाहता, त्यांना या निवडणुकीत उतरवणे गरजेचे असल्याचे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे झाले असल्यास नवल वाटायला नको. परंतु जयश्रीताई या काँग्रेसमध्ये असल्या कारणाने त्यांना शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश करावा लागला. प्रवेश करताच त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात उमेदवारीची माळ जयश्रीताईंच्या गळ्यात घातली. जयश्रीताई या ओजस्वी वाणीच्या धनी आहेत. भाषणाला उभ्या राहिल्या की, उपस्थितांच्या मनाचा ठाव घेण्याची त्यांची हातोटी आहे. बुलढाणा जिल्ह्यासह मतदारसंघातील समस्यांची त्यांना चांगली
जाण आहे. जयश्रीताईंचे व्यक्तिमत्व हे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे. विरोधक देखील त्यांच्याविरोधात बोलताना आदरानेच बोलतात. महिलांमध्ये जयश्रीताईंची प्रतिमा अत्यंत धवल अशाप्रकारची आहे. त्यामुळे जयश्रीताईंना हरवणे संजय गायकवाड यांच्यासाठी फारच कठीण जाणार यात शंका नाही. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे जयश्रीताई यांना शिवसेना (उबाठा) गटातील ज्या इच्छुकांना उमेदवारी नाही मिळाली, त्या नेत्यांचे मन जिंकावे लागेल. कारण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत हे फार इच्छुक होते. जर जयश्रीताईंनी ही किमया साधली, तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाला पहिली महिला आमदार मिळू शकते, यात काहीच शंका नाही.

Previous articleआई जिजाऊ शक्ती दे’…उमेदवारी घोषित होताच ‘ जयश्रीताई ‘मातृतीर्थावर नतमस्तक शहरात ठीक-ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
Next articleगाऊन तोंडावर टाकून ‘सौभाग्य’ लांबविले!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here