Home भंडारा अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांची परिस्थिती महाराष्ट्रात तळ्यात मळ्यात

अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांची परिस्थिती महाराष्ट्रात तळ्यात मळ्यात

82
0

आशाताई बच्छाव

1000889575.jpg

अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांची परिस्थिती महाराष्ट्रात तळ्यात मळ्यात

दैनिक युवा मराठा जिल्हा प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याशी संस्थाचालक रोशन जांभूळकर यांनी केलेली बातचीत

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या ज्या आश्रम शाळा आहेत 2000 पासून त्या आश्रम शाळेची परिस्थिती आज 24 वर्षे होत आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रातील जे जे सरकार सत्तेत आले त्या सरकारने अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना अजून पर्यंत निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे या शाळांनी आश्रम शाळा कशा चालवाव्यात ! शिक्षकांचे पगार कसे द्यावेत ?मुलांचे भरण कसे करावे? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे! इतकेच नव्हे तर या आश्रम शाळेचे संस्थापक सुद्धा काही मरण पावलेली आहेत. अशा परिस्थितीत सरकार अनुसूचित जातीचे जे संस्थापक आश्रम शाळा चालवीत आहेत त्यांनी किती दिवस स्वतःच्या पैशावर शाळा चालवावी असा प्रश्न निर्माण होतो ?परंतु या महाराष्ट्रातील झोपेची सोंग घेतलेल्या शासनाला अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना निधी का देत नाही त?यांच्या जीवनाशी का महाराष्ट्रात जे जे सरकार झाले ते सरकार का खेळ खेळत आहेत . महाराष्ट्रातील सरकार मानसिकतेच्या दृष्टिकोनातून या आश्रम शाळांच्या संस्था चालकांना बघत आहे का असा प्रश्न निर्माण होतो? आणि बाकीच्या ज्या साध्या शाळा आहेत त्यांना सरळ 20% पासून 40 टक्के 60 टक्के अशी ग्रँड शासनाने 2005 पासून दिलेली आहे .सदर संस्था चालक अनुसूचित जातीचे असल्यामुळे शासनाप्रती त्यांच्या मनात कुजबूत आहे की काय?संस्थाचालकांच्या संस्था बंद पाडण्याचे षंडयंत्र नाही ना? त्यामुळे शासनाला विनंती आहे की त्,यांनी या अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना शंभर टक्के ग्रँड देऊन शिक्षकांचा ,विद्यार्थ्यांचा व संस्थाचालकांचा प्रश्न सोडवावा अशी माहिती दैनिक युवा मराठा चे भंडारा जिल्हा प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याशी बोलताना संस्थाचालक रोशन जांभुळकर भंडारा यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here