Home भंडारा शेतकऱ्यांनी उद्योजक बनावे-किशोर पात्रीकर उपविभागीय कृषी अधिकारी

शेतकऱ्यांनी उद्योजक बनावे-किशोर पात्रीकर उपविभागीय कृषी अधिकारी

31
0

आशाताई बच्छाव

1000841914.jpg

शेतकऱ्यांनी उद्योजक बनावे-किशोर पात्रीकर उपविभागीय कृषी अधिकारी

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)दैनंदिन बदलत्या वातावरणानुसार, हवामानानुसार आणि पिकपरत्वे वातावरणातील बदलांचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवानी पिक बदल करावे असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी किशोर पत्रिकर यांनी केले. शेतकऱ्यांची पंढरी ही आपली माय म्हणजे शेती असून आपल्या मातृभूमीची जोपासना करून मातृभूमीला जीवंत ठेवून पिक पद्धती आणि बाजरपेठेचा अंदाज घेऊन पिकांची लागवड करावी आणि शेतकरी बांधवानी एक व्यावसायिक गुण अंगीकृत करून शेती करावी असे प्रतिपादन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तालुका पवनी अंतर्गत आयोजित किसान गोष्टी कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा),तालुका पवनी अंतर्गत दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ ला मौजा भेंडाळा येथिल चिंतामणी शेतकरी उत्पादक कं. लि. भेंडाळा *येथे क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सर्वप्रथम विघ्नहर्ता श्रीगणेशाचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला परिसरातील १५५ शेतकरी, प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कं.प्रतिनिधी आणि नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत शेतकरी गट आणि शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि उत्पादन त्याचे ताळमेळ घालून शेती करणे आणि निरोगी आणि विषमुक्त अन्न शेवटच्या घटकाला पुरवठा करून आर्थिक खर्चात बचत करून एका छताखाली एका ब्रॅण्ड ने शेतीमालाची विक्री करणे हा एक उत्पन्न दुप्पट करण्याचे महत्त्वाचा भाग आहे.
क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपस्थिती म्हणून प्रकल्प उपसंचालक आत्मा भंडाराचे अजयकुमार राऊतयांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शनर मनोगत व्यक्त केले.शेतकरी बांधवानी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत बांधावरील प्रयोगशाळा या घटकाचा लाभ घेऊन जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होईल.

सुधीरजी धकाते कृषि तज्ञ तथा निर्यातदार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना शेतकऱ्यांनी चांगल्या गणावत्तेचं आणि निर्यातक्षम भाजीपाला उत्पादित करून प्रतवारी,पकेजिंग आणि योग्य पद्धतीने ब्रँडिंग करून विक्री करावे जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत/ग्राहकापर्यंत गुणवत्ता पूर्ण भाजीपाला पोहचून शेतकरी बांधवाना योग्य दर कसे मिळेल यावर सखोल असे मार्गदर्शन केले.

*शेतकरी मनोगत*

नरेंद्र आयातुलवार प्रगतिशील शेतकरी मौजा तिर्री यांनी शेतकरी बांधवानी शेतीमधील बारकावे ओळखून जीवो,जीवश्य, जीवन:म या उक्तीप्रमाणे निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती करावी असे मनोगत व्यक्त केले.

ठिंबक सिंचन आणि फर्टिगेशनचा वापर करून भाजीपाला शेती

नरेश ढोक मौजा नीलज यांनी शेतकरी बांधवांना ठिबक सिंचनाचा वापर करून भाजीपाला लागवड करावी अणि जे काही तंत्रज्ञान पाहिजे त्याकरिता कृषि विभाग आपल्या पाठीशी सदैव तत्पर असून तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेती करून शेतकरी बांधवानी उद्योजक बनावे आज मी शेती करीत असताना बाजारपेठेचा अभ्यास करून शेडनेटचा वापर करून भाजीपाल्याची रोपे विक्री करून एक उद्योजक बनलो आणि आपणसुद्धा बनावे असे आजच्या किसान गोष्टी कार्यक्रम सत्कारप्रसंगी बोलत होते.
आज किसान गोष्टी कार्यक्रमाप्रसंगी विभागाच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले

भात शेती, संधी आणि आव्हाने

राजेंद्र फुलबांधे अध्यक्ष चिंतामणी शेतकरी उत्पादक कं. लि. यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भात शेती करीत असताना फक्त आणि फक्त शेती म्हणून नव्हे तर एक व्यावसायिक म्हणून शेती करून एक उद्योजक म्हणून शेती करा आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतातील उत्पादित मालाचे कंपनीच्या नावाने एक ब्रँडिंग करून वक्री करावे जेणेकरून आपल्या मालाची किम्मत आपण ठरवू शकू असे प्रतिपादन राजेंद्र फुलबांधे यांनी केले.

सदर क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाला दीपक लोंढे उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा,डॉ. प्रशांत उंबरकर किटकशास्त्रज्ञ केव्हीके साकोली, कांचन तायडे विषय विशेषज्ञ केव्हीके साकोली,कार्तिक नखाते कृषि अधिकारी, पवनी,विजय हुमणे मंडळ कृषि अधिकारी, पालोरा,तालुका कृषि अधिकारी कार्यालय अंतर्गत क्षेत्रीय कृषि सहाय्यक/सेवक,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच पुंडलिक घ्यार प्रगतिशील शेतकरी, अनिल नौकरकर अध्यक्ष चौरास शेतकरी उत्पादक कं. लि., आणि परिसरातील महिला,पुरूष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर किसान गोष्टी कार्यक्रम उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध यशस्वी करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी, पवनी अंतर्गत अधिकारी, कर्मचारी आणि चिंतामणी शेतकरी उत्पादक कंपनी यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषि अधिकारी,पवनी दिनेश काटेखाये यांनी तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सतिश वैरागडे यांनी केले. आभार भुमेश नवखरे कृषि पर्यवेक्षक यांनी केले.

Previous articleमौजा पाथरी टोला वस्तीतील गट क्र.५५३ मधील अतिक्रमण हटविण्यास दिवाणी न्यायालय, क.स्तर पवनी कडून स्थगिती चे आदेश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here