Home बीड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्यांची जय्यत तयारी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्यांची जय्यत तयारी

53
0

आशाताई बच्छाव

1000827357.jpg

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्यांची जय्यत तयारी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/आष्टी दि: ०९ ऑक्टोंबर २०२४ बीड जिल्ह्यातील आष्टी / पाटोदा सीमेवरती संत भगवान बाबा यांचे जन्मगाव सावरगाव घाट या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पंकजाताई मुंडे दसरा मेळावा घेत आहेत. व गोपिनाथ मुंडे साहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा जपत आहेत. या मेळाव्याला वंचितांचा शोषितांचा व बहुजनांचा मेळावा म्हटले जाते. या मेळाव्याकडे दरवर्षीच अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते की मेळ्यामधून पंकजा मुंडे काय बोलणार यावर्षी देखील तीच उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. विधानसभेच्या तोंडावरती दसरा मेळावा असल्यामुळे अधिकच उत्सुकता दिसून येत आहे. सावरगाव घाट येथे दोन ठिकाणी ३००/३०० एकर मध्ये पार्किंगचे नियोजन केले आहे. तर भव्य दिव्य अशी भगवान बाबांची असलेली स्मृतीचे रंग रांगोळीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. सभा स्थळाची देखील साफसफाई व आलेल्या भाविक भक्तगणाची कुठलीही गैरसोय होऊ नये असे ग्रामस्थांकडून नियोजन करण्यात येत आहे.

Previous articleलोकहो, अंधश्रद्धा निर्मुलन हेच खरे राष्ट्रप्रेम :- राहुल डोंगरे
Next articleवसमत मध्ये रस्त्याचे काम संथगतीने सुरू, नागरिक त्रस्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here