आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे आमदार राजकुमार पटेल शिंदे सेनेत! पाटेल यांना बच्चू कडूंनीच पाठवले असा आ. राणांचा आरोप.
दैनिक युवा मराठा
पी. एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
प्रहार संघटनेचे लय घाटातील आमदार राजकुमार पटेल यांना शिवसेना शिंदे गडाख पाठविण्याचे खेळी बच्चू कडू यांचीच आहे. खरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय फिक्सिंग असून महायुतीतून शिंदेचे निर्णय राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिल्यास आम्ही विरोधात काम करू असा इशारा युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक तथा आमदार रवी राणा यांनी मंगळवारी प्रसार माध्यमाची बोलताना दिला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी धारणी येथे एका कार्यक्रमास आमदार राजकुमार पटेल हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे पार्श्वभूमीवर बडनेरा चे आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर तोफ डागली. आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत महायुती आले. त्यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष पद भूषविताना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळविला एवढेच नव्हे तर वाय प्लस सुरक्षा देखील मिळवली. असे असताना आमदार कडूनि कधीच महायुतीचा धर्म पाळला नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात काम केले हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच आमदार पटेल यांना शिवसेनेत पाठविणे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय साठे लोटे आहे. असा आरोपही आमदार राणा यांनी केला. मात्र आमदार कडू आणि राजकुमार पाटील यांना कोणतीही खेळी करू द्या, त्यांचा येत्या विधानसभा निवडणुकीत हिशोब करणारा असा इशारा राणा यांनी दिला आहे. आमदार बच्चू कडू यांचे राजकारण म्हणजे बाप बनाना भैया अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. या प्रकरणी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर अमरावती जिल्ह्यात राजकीय धुमशान मोठ्या प्रमाणात सुरू असून आरोप प्रत्यारोप फैरी झाडत आहे. आ. बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन केली. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाणार नाही, असे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान मला राष्ट्रवादी अजित पवार गट,शिवसेना उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी शरद पवार गट,यांच्याकडून पक्षात येण्याची अफार होती. मात्र प्रत्यक्षात मी जेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटलो आणि तिसऱ्या आघाडीतून निवडणूक लढवणार नाही, असे त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी लागलीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करा, अशी ऑफर दिली होती. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी मेघाच्या विकासासाठी भरून निधी दिला आहे. त्यांच्याशी अगोदरपासून जवळीक होती. मुख्यमंत्री हे जिंदादिल माणूस असून त्यामुळे मी शिवसेना प्रवेश करणार असल्याचे आ. राजकुमार पटेल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.