आशाताई बच्छाव
गट क्रमांक 553 वर १७ लोकांचे अतिक्रमण करून घर बांधले असताना सरपंच पल्लवी समरीत यांनी पदाचा दुरुपयोग करून फक्त प्रभाकर नागपुरे यांना अतिक्रमण काढण्यासंबंधी बजावली नोटीस
गट क्रमांक 553 ही जागा सरकारी मग ग्रामपंचायतला अधिकार कोणी दिले?
चिचाळ( पाथरी) पुनर्वसन येथील प्रभाकर नागपूरे यांचा कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील पाथरी पुनर्वसन येथील सरपंच सौ.पल्लवी प्रफूल्ल सम्रीत यांनी पदाचा व शक्तीचा दुरुपयोग करून मनमानी कारभार सुरू केल्याचा आरोप प्रभाकर नागपुरे यांनी केलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पवनी तालुक्यातील पाथरी पुनर्वसन हे गाव गोसे धरणात गेल्यामुळे या गावाचे पुनर्वसन झालेले आहे.तसे या गावाचे पुनर्वसन होण्याआधी काही लोकांचे घरे नदीच्या पुरामुळे प्रभावित होत असल्याने काही लोकांनी पाथरी टोला या सरकारी जागेवर अतिक्रमण करून घरे बांधले आहेत.आणि तेव्हा पासून पाथरी टोला या गावात पूर्ण जनताच शासकीय जागेत अतिक्रमण करून रहात आहेत. सात महिने आधी प्रभाकर महादेव नागपुरे यांचे राहात असलेले घर अगदी दोन रूम चे असल्याने व ते घर पुर्ण मोडकळीस आल्याने यांनीगट क्र.५५३ या सरकारी जागेत चार रूमचे घराचे बांधकाम केले आणि या घरात पूर्ण परिवार सहित सहा महिने पासून रहात आहेत.या परिवारात ऐकुन पाच सदस्य असून अत्यंत गरीब असून मोलमजुरी करून जीवन जगत आहेत.
परंतु पाथरी पुनर्वसन गावातील सरपंच सौ.पल्लवी प्रफुल्ल सम्रीत यांनी चिरीमिरीची प्रभाकर नागपुरे यांना मागणी केली होती. परंतु मागणी पूर्ण न केल्यामुळे सरपंच कडून अतिक्रमण पाडण्याचे नोटीस दिले आहेत.परंतु पाथरी टोला या वस्तीत गट क्र.५५३ मध्ये १७ लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधलेले आहेत.तसेच सरपंच सोबत खूब मोठ्ठी साठगाट करून सरकारी जागेवर अतिक्रमण करून घरकुला चे बांधकाम केलेले आहे.शासकीय नियमानुसार सरकारी जागेत घरकुल मंजूर केल्या जात नाही परंतु या गावात सरपंच यांनी लाभार्थ्यासोबत साठगाठ करून घरकुल २०२३-२४ मध्ये व २०२४-२५ मध्ये सरकारी जागेत घरकुल चे बांधकाम केले आहे.तसेच १७ अतिक्रमण लोकं पैकी कोणालाही सरपंच कडून नोटीस न देता फक्त भेदभाव करून व चिरीमिरी न दिल्यामुळे प्रभाकर नागपुरे यांनाच अतिक्रमन हटविण्याचे नोटीस दिले आहे. व याबाबत पुन्हा ग्रामपंचायत मध्ये मासिक सभेत बेकायदेशीर तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवून अतिक्रमण हटविण्याचे ठराव घेतल्याचे गावात चर्चा आहे.
गट क्र.५५३ हि जागा ७/१२ नुसार सरकार असे उल्लेख आहे.या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे अधिकार ग्रामपंचायत ला कोणताही अधिकार नसतांना बेकायदेशररित्या सरपंच कडून नोटीस देण्यात आलेले आहे.तहसीलदार यांचे दि.२४/०९/२०२४ च्या सचिव, ग्रामपंचायत पाथरी पुनर्वसन यांना दिलेल्या पत्रात स्पस्ट म्हटले आहे.की गट क्र.५५३ हि जागा ७/१२ नुसार सरकारी असल्याने व वन विभागाची असल्याने या जागेचे सिमांकन करून हि जागा ग्रामपंचायत ला हस्तांतर होत नाही तेव्हा पर्यंत ग्रामपंचायत कोणतेही अतिक्रमण हटवू शकत नाही.आणि १७ अतिक्रमण धारकांना वगळून का विशिष्ट व्यक्तीला भेदभाव पूर्ण नोटीस देवून बेकायदेशीर कारवाही करू नये असे तहसीलदार पवनी यांनी या पत्रात म्हटले आहे.
परंतु सरपंच यांना ५५३ या गटातील आणि शासनाची कोणतीही परवानगी नसतांना चिरीमिरीची मागणी पुर्ण न केल्यामुळे बेकायदेशीर व मनमानी कारभार सरपंच करीत असून अतिक्रमण हटविण्या बाबद तत्काळ तसा ठराव घेवून अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे गावात चर्चा आहे.त्यामुळे प्रभाकर नागपुरे यांनी ऐका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,माझे घराचे बांधकाम बेकायदेशररित्या जर अतिक्रमण सरपंच कडून पाडण्यात आल्यास सरपंच यांच्या घरासमोर पूर्ण परिवार सहित आत्मदहन करेल.असा इशारा दिलेला आहे.पोलीस स्टेशन मध्ये या आधी प्रभाकर नागपुरे यांनी तक्रार सुद्धा दिलेली आहे.त्या तक्रारीवर सरपंच,पोलीस पाटील व इतर १७ लोकांना कायद्याचे उल्लंघन करू नये या बाबद नोटीस सुद्धा दिलेले आहेत.तरी पण सरपंच हे कायद्याला न जुमानता व पदाचा दुरुपयोग करून गावात अशांतता निर्माण करीत आहे.