आशाताई बच्छाव
मराठा मावळा संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश
जालना बाजार समितीत अखेर शेतकर्यांच्या मुलांसाठीच्या वसतिगृहाचे लोकार्पण
जालना,ः दिलीप बोंडे ब्युरो चीफ –केवळ आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. गुणवत्ता आणि बुद्धीमत्ता असूनही ग्रामीण भागातील मुले स्पर्धेत मागे राहतात. अशा शेतकर्यांच्या मुलांसाठी जालनासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने वसतीगृह उभारावे, अशी मागणी मराठा मावळा संघटनेच्या वतीने लावून धरली होती. या मागणीला यश आले असून, रविवारी या वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
शेतकर्यांच्या मुलांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वसतिगृह उभारण्यात यावे, अशी मागणी मराठा मावळा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृउबाचे सभापती अर्जुनराव खोतकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच या मागणीच्या अनुषंगाने आंदोलनही करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत रविवारी वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, सद्या शेतकर्यांची आर्थीक परिस्थिती बिकट झाली असून पावसाअभावी शेतकर्यांची रब्बी पिके हातची गेली तर खरीप पिकाचीही गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी पाठविणे कठीण झालेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षण अर्ध्यात सोडविण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत शासनाने मुलांसाठी तात्काळ वस्तीगृह उभारण्यासाठी हालचाल सुरू केली तर निश्चितच शेतकर्यांच्या मुलांसाठी शिक्षण घेणे सोयीस्कर होईल, असे या निवेदनात म्हटले होते.या निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर, दादाराव गावंडे, महादेव कदम, आत्माराम गायकवाड, आदींच्या सह्या आहेत.