आशाताई बच्छाव
भोकरदन विधानसभा मतदार संघातील प्रस्थापितांना आजी-माजी आमदारांना या
निवडणुकीत त्यांची जागा दाखवा- अॅड. भास्कर मगरे
– हजारो भुमिहिन,कास्तकरांची गर्दी :
भोकरदन, दि. ६(प्रतिनिधी दिलीप बोंडे)– भोकरदन विधानसभा मतदार संघातील प्रस्थापितांना
आजी-माजी आमदारांना या निवडणुकीतून त्यांची जागा दाखवा, असे रोखठोक आवाहन
शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख तथा भुमिहिन कास्तकरांचे नेते अॅड.
भास्कर मगरे यांनी केले. भोकरदन येथील खुला मैदानावर दलित आदिवासी
भुमिहिन कास्तकर आणि शिवसेना दलित आघाडी कार्यकर्ता मेळावा आयोजित
करण्यात आला होता. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असलेले दलित
आदिवासी भुमिहिन, कास्तकरांचे नेते तसेच जालना ते मुंबई भुमिहिन लाँग
मार्च प्रणेते शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे
होते.
यावेळी संबोधतांना करतांना अॅड. भास्कर मगरे म्हणाले की, राज्यातील
विशेषतः मराठवाड्यातील दलित आदिवासी भुमिहिन कास्तप्टे नावे करुन सातबारा
देण्यात यावा या प्रमुख मागणीसह दलित आदिवासीच्या ज्वलंत प्रश्नांवर
लोकशाही मार्गाने शेकडो आंदोलने मोठ्या जनसमुदायाने केले आहेत. मात्र
शासन आणि प्रशासन दलित आदिवासींच्या उदरनिर्वाहचे प्रश्न महायुती सरकार
राज्यात २०१४ पासून अस्तित्वात असताना गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून
येत आहे. शासन निर्णय २८ नोव्हेंबर १९९१ अधिनियमानुसार १ एप्रिल १९७८ ते
१४एप्रिल १९९० च्या दरम्यान व १४ एप्रिल १९९० ला अस्तित्वात असलेले
शासकीय पडीत जमीनीवरील शेतीसाठी झालेले अतिक्रमण नियमानुकूलित करुन
सातबारा उतारा देण्याची तरतुद आहे.
मात्र शासन आणि प्रशासन दलित आदिवासींच्या प्रश्नांवर उदासिन असल्याचे
दिसून येत आहे.