Home जालना दहन अवगुणांचा

दहन अवगुणांचा

45
0

आशाताई बच्छाव

1000819076.jpg

दहन अवगुणांचा
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 06/10/2024
शारदीय नवरात्र, नऊ दिवस उत्साहात चालणारा उत्सव यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी,चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कांत्यायनी, कालरात्री,महागौरी,आणि सिद्धीदात्री अशा एकूण नऊ देवींची नऊ दिवस अगदी मनोभावे पूजा केली जाते आणि शेवटी दहाव्या दिवशी असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा हा सण रावणाचे दहन करून अगदी उत्साहात साजरा केला जातो.अशा या नवरात्रामध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची वेगवेगळ्या रूपात पूजा करत असताना आपल्या अंतर्मनातील गुण आणि अवगुण यांचे देखील आपण चिंतन करत आहोत त्यामध्ये आज आपण गैरसमज या आपल्या मधील अवगुणाचा विचार करूया,,बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसून देखील फक्त कोणीतरी सांगितले म्हणून थोड्याशा कारणावरून समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो त्यामुळे कळत नकळत समोरच्या व्यक्तीशी संवाद साधने टाळले जाते आणि त्याचा परिणाम फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या अवतीभवती असलेल्या सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो म्हणून कोणत्याही गोष्टीचा मनातल्या मनात गैरसमज निर्माण करून घेतल्यापेक्षा जर आपण त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या स्वभावाबद्दल प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच पूर्ण माहिती नसताना समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात निर्माण झालेला गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल आज आपण सर्वजण प्रत्यक्ष पाहत आहोत की आपल्या अवतीभवती अनेक कुटुंबांमध्ये विशेष काही कारण नसताना देखील फक्त एकमेकाबद्दल असलेला गैरसमज सर्व कुटुंबीयातील व्यक्तींसाठी ताण-तणावाचा विषय होत चालला आहे. कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती जर घरातील इतर सदस्यांना काही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर तो देखील आपल्यावर होत असलेला अन्याय आहे असे नवीन पिढीतील अनेक मुला-मुलींना वाटत असते त्यामुळेच पूर्वी एकमेकांच्या संवादातून घराच्या चार भिंती आत मिटवले जाणारे वाद आज कोर्टाच्या पायरी पर्यंत पोहोचत आहे याला जर कोणी जबाबदार असेल तर ते म्हणजे आपल्या मनामधील एकमेकाबद्दल असलेला गैरसमज कारण घरातील कोणतीही वडीलधारी व्यक्ती लहान व्यक्तींना काही समजून सांगत असेल तर त्यामागे त्या व्यक्तीची आपल्या कुटुंबाबद्दल असलेली काळजी असते मात्र आपल्याला जाणून बुजून प्रत्येक कामामध्ये सल्ले दिले जातात याचा अर्थ आपल्याला काहीच कळत नाही का..? असा गैरसमज नवीन पिढीमध्ये निर्माण झालेला असतो मात्र आपल्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना विचारून जर आपण कोणत्याही कार्याला सुरुवात केली तर आपण त्यामध्ये नक्कीच यशस्वी होणार असा विश्वास आजच्या नवीन पिढीमध्ये जर निर्माण व्हायचा असेल तर सर्वप्रथम या नवरात्रीच्या निमित्ताने कुटुंबातील किंवा नात्यातील व्यक्ती विषयी पूर्ण माहिती नसताना झालेला गैरसमज नावाचा अवगुण आपल्याला दूर करता आला तर खऱ्या अर्थाने आपण नवरात्री साजरी केल्याचे विशेष फळ आपल्याला प्राप्त होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या मधील अवगुणांचा नाश करून आपल्यातील चांगल्या गुणांचा विजय व्हावा यासाठी नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा

पुनम सुलाने-सिंगल
गोकुळवाडी
ता. जाफराबाद
जि.जालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here