आशाताई बच्छाव
जगदंबा देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची परंपरा
वानखेड येथील नदीच्या दोन्ही तिरावर देवीचे मंदिर जगदंबा माता
स्वप्निल देशमुख
सातपुड्याच्या कुशीतून उगम पावलेल्या वान नदीच्या तीरावर वानखेड हे गाव वसले आहे. या गावाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेचे नदीच्या दोन्ही तिरावर दोन पुरातन मंदिर आहेत. नदीच्या तिरावर असलेले मंदिर हे हेमाडपंती असून तुळजाभवानीची प्रतिमूर्ती येथे विराजमान आहे. मूळ पिठाच्या तिन्ही मूर्ती माता जगदंबेच्या रुपाने वानखेड येथील मंदिरात विराजमान आहेत. जगदंबा देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा आहे. वानखेड येथील जगदंबा देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराला देवीच्या सासर माहेराची संकल्पना पुरातन काळापासून आजपर्यंत कायम आहे.
तालुक्यातील वानखेड येथील जगदंबा माता अनेकांच्या श्रद्धेचे दैवत आहे. नवरात्रात जगदंबा मातेचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. तालुक्यातील एकमेव गाव असलेल्या वानखेड गावात नवरात्र उत्सव दरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. मंदिर परिसरातील रोषणाई व सजावट भाविकांना आकर्षित करते. वानखेड येथील वान नदीच्या अलीकडील व पलीकडील अशा दोन तिरावर मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी गावाबाहेरील मंदिरात जगदंबा मातेचे महिनाभरासाठी वास्तव्य राहते. एक महिन्यानंतर पुन्हा देवीची स्थापना नदीच्या पलीकडील तीरावर म्हणजेच गावात केली जाते.
या स्थलांतराला देवीच्या सासर माहेरची संकल्पना दिली आहे. ही अनोखी परंपरा मागील अनेक वर्षांपासून
मंदिरातील देवीची मूर्ती.
जोपासली जात आहे. या मंदिरासमोर महाद्वार असून, महाद्वारालगत जगदंबा मातेचा रथ ठेवण्याची जागा आहे. एका आख्यायिके नुसार देवीच्या मूर्ती या पैलतीरावरील मंदिरात होत्या. शिवकाळातील शक्ती उपासकाच्या वतीने अमृतराव देशमुख यांच्या स्वप्नात येवून प्रतिस्थापनेची आज्ञा जगदंबा मातेकडून झाली, त्यानंतर सद्यःस्थितीत असलेल्या गावातील मंदिरात गावकऱ्यांच्या वतीने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इतिहास आहे. करण्यात आल्याचा वानखेड येथील जगदंबा मातेच्या
मंदिरात अनेक उत्सवांपैकी दोन उत्सव साजरे करण्यात येतात. त्यापैकी पहिला उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. नवरात्रोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. घटस्थापनेपासून अष्टमीपर्यंत दररोज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. नवरात्र उत्सव वानखेड परिसरातील भक्तांच्या सहभागाने साजरा करण्यात येतो. हा उत्सव साजरा करण्यासाठी मंदिरांचे विश्वस्त व वानखेडचे ग्रामस्थ तन मन धनाने स्वतःला झोकून देतात. नवरात्रात या देवीचे विशेष महत्व आहे.
जगदंबा मातेच्या स्थलांतराची अनोखी परंपरा वानखेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येते. महाराष्ट्रात स्थलांतराची एकमेव परंपरा वानखेड येथे सरू आहे. गावातील नागरिकांसह महाराष्ट्रातील भाविक येथे मोठ्यासंख्येने येतात.
वसंतराव आनंदराव देशमख अध्यक्ष, जगदंबा देवी संस्थान, वानखेड,